Type Here to Get Search Results !

हिंगणघाट शहरातील शिवसेना उबाठाच्या जेष्ठ नेत्या योगशिक्षिका तथा समाजसेविका प्राची प्रसाद पाचखेडे यांचा भाजपात प्रवेश



हिंगणघाट,दि. ०१ नोव्हेंबर २०२५

        विधानसभा क्षेत्राचे कार्यसम्राट आमदार समीर कुणावार  यांचे कार्यशैलीने प्रभावित होऊन स्थानिक  हिंगणघाट शहरातील  उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या फायर ब्रँड नेत्या तथा योगशिक्षिका, समाजसेविका प्राची ताई प्रसाद पाचखेडे यांनी भारतीय जनता पक्षात पक्षप्रवेश  घेतला.

      सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आमदार समीर कुणावार यांचेसह भाजपा ज्येष्ठ नेते किशोर भाऊ दिघे, भाजपा जिल्हा महामंत्री आकाश  पोहाणे, भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अंकुश ठाकुर, भाजपा जिल्हा उपाध्यक्षा छायाताई सातपुते, माजी नगराध्यक्ष प्रेमबाबू बसंतानी, माजी नगराध्यक्ष निलेश ठोंबरे,  संजय देहणे , वामनराव चंदनखेडे, भाजपा तालुका अध्यक्ष विनोद  विटाळे, समुद्रपूर तालुका भाजपा अध्यक्ष हेमंत राऊत, अनुसूचित जमातीचे भाजपा जिल्हाध्यक्ष शंकर आत्राम, भाजपा शहराध्यक्ष भूषण पिसे, भाजपा शहर कार्यकारी अध्यक्ष संजय माडे, शरद कोणप्रतिवार, देवा वाघमारे,  इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

     यावेळी आ.  समीर कुणावार यांनी प्राचीताई प्रसाद पाचखेडे यांना भाजपाचा शेला देऊन सन्मान करीत त्यांचे जगातील सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपामध्ये प्रवेश केल्याने स्वागत केले.

     पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करीत आ. कुणावार यांनी पक्षाचे ध्येयधोरणांचा समाजात प्रचार करण्याचे आवाहन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या