*जीवनोन्नती अभियानाअंतर्गत तालुका अभियान व्यवस्थापन कक्षाची वार्षिक आमसभा सभा संपन्न..*
*सभेच्या अध्यक्षस्थानी आ. समिर कुणावार यांची उपस्थिती..*
प्रतिनिधी : अश्विन बोंदाडे
हिंगणघाट,दि.१ नोव्हेंबर
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM) अंतर्गत तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, हिंगणघाट आणि शाश्वत प्रभाग संघ, वाघोली यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक सर्वसाधारण सभा आज दि.१ रोजी पार पडली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विधानसभा क्षेत्राचे आमदार समिर कुणावार हे होते.
उपरोक्त सभेत मागील आर्थिक वर्षातील कामकाजाचा अहवाल व आर्थिक आढावा सादर करण्यात आला. गेल्या वर्षभरात प्रभाग संघाने राबविलेल्या विविध उपक्रमांमध्ये महिलांच्या बचत गटांचे बळकटीकरण, सूक्ष्मउद्योग उभारणी, डिजिटल साक्षरता प्रशिक्षण, कृषीपूरक व्यवसाय, आणि सामाजिक परिवर्तनाच्या मोहिमा या सर्वांचे तपशीलवार चर्चा करण्यात आली. यावेळी आ. कुणावार यांनी जीवनोन्नती अभियानाअंतर्गत महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे ही काळाची गरज असल्याचे मनोगत व्यक्त करत यासाठी आपण सर्व सहकार्य करण्यास तत्पर असल्याचे सांगितले.
सदर कार्यक्रमाला डॉ. प्रणाली सायंकार , हिंगणघाट येथील पोलिस उपनिरीक्षक कुमिदिनी पाटोडे , तालुका अभियान व्यवस्थापक सचिन सावरकर, प्रभाग संघाच्या अध्यक्षा भारती महाकाळकर, सचिव नंदाताई कामडी , उपाध्यक्षा प्रीती परमोरे, भारत हेमके, आशा कोल्हे, श्रीमती बी.एम.लोखंडे, बी .एम . पोलखोडे , महिला मोर्चाच्या नलिनीताई सयाम, वाघोली येथील ग्रामसेवक नितीन पाटील इत्यादी सोबत वाघोली शाश्वत प्रभाग संघाच्या असंख्य महिला भगिनी सदर कार्यक्रमाला उपस्थित होत्या.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या