सचिन हाडके
जिल्हा प्रतिनिधी
हिंगणघाट: शहराच्या सर्वानीन विकासासाठी कला, संस्कृतीचाही विकास होणे गरजेचे आहे. यादृष्टीने निर्माणाधीन सांस्कृतिक सभागृहाचे काम हे माईलस्टोन आहे,आयुष्यभर लक्षात राहील असे आहे. मी जनतेला शब्द दिलेला होता,या इतिहासिक वास्तू मुळे त्याची पूर्तता होत आहे, इतिहासात मानाचा तुरा रोवला जाणार आहे, जनतेच्या भक्कम पाठबळामुळे हे शक्य झालेले आहे, असे विचार आमदार समीर कुणावार यांनी सोमवारी दिनांक 3 नोव्हेंबर 2025 ला आपल्या भाषणात मांडले.
राज्य शासनाच्या निधीतून प्रस्तावित १७ कोटी रुपयांच्या सांस्कृतिक सभागृह नाट्यगृह च्या इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी व्यक्त केले. आमदार समीर कुणावार यांच्या विशेष प्रयत्नांतून राज्य शासनाच्या सहकार्याने नगर पालिकेच्या वतीने बांधण्यात येणाऱ्या १७ कोटी रुपयांच्या 'सांस्कृतिक सभागृह नाट्यगृह भूमिपूजनाचा कार्यक्रम उपजिल्हा रुग्णालय मागील शासकीय जागेवर आयोजित करण्यात आलेला होता.यावेळी आमदार समीर कुणावार बोलत होते. कार्यक्रमाला माजी खासदार रामदास तडस, बाजार समिती सभापती एडवोकेट सुधीर कोठारी, माजी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, माजी नगराध्यक्ष निलेश ठोंबरे, नगर पालिका प्रशासक प्रशांत उरकुडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आमदार समीर कुणावार यांनी बोलण्यापेक्षा कृतीतून काम करणे महत्त्वाचे आहे असे सांगितले. स्वप्न पूर्ण झाले याचे मला समाधान आहे,असेही ते म्हणाले.
नगरपालिका हे शहराचे मंत्रालय आहे. यात चांगले शासन प्रशासन असणे आवश्यक आहे. तरच शाश्वत विकास साधला जाऊ शकतो. शहरात करोडो रुपयांचे विकास कामे झपाट्याने झालेली आहेत, आपण याचे साक्षीदार आहोत. विकास कामांसाठी शिताफीने निधी मिळवावा लागतो. शिल्पकार जनता आहे. सध्या नगरपालिकेत लोकनियुक्त प्रशासन नसल्याने जनता समस्या घेऊन थेट माझ्या कडे येतात, त्याच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याचा प्रयत्न असतो. हीच स्थिती ग्रामपंचायत ची आहे. ज्ञानेश्वर वार्डातील २० वर्ष जुनी पाण्याची समस्या निकाली लागली आहे. शहरात पाणी पुरवठा करिता वणा नदीवर बंधारा बांधण्यात येत आहे, बंधारा झाल्यावर २४ तास पाणी देण्याचे स्वप्न पूर्ण होईल, असा विश्वास आमदार समीर कुणावार यांनी व्यक्त केला. यावेळी माजी खासदार रामदास तडस, बाजार समिती सभापती एडवोकेट सुधीर कोठारी, माजी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी यांचेही भाषण झाले. प्रास्ताविक नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांनी केले. संचालन अजय बिरे यांनी केले. नगर परिषदेच्या अभियंता अमृता झारे यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने साहित्य, कला , क्रीडा , सामाजिक व राजकीय क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या