Type Here to Get Search Results !

हिंगणघाट बस स्थानकाचे पूर्ण बांधणी कामाचे भूमिपूजन सोहळा संपन्न



         सचिन हाडके 

      जिल्हा प्रतिनिधी

आज दिनांक ३ नोव्हेंबर २०२५ रोजी हिंगणघाट बस स्थानक पुनर्बांधणी कामाच्या भूमिपूजन सोहळ्याचा भव्य कार्यक्रम पार पडला. या सोहळ्याने हिंगणघाट शहराच्या विकास प्रवासात एक नवा आणि महत्त्वपूर्ण अध्याय जोडला आहे. शहराच्या वाहतूक सोयींना आधुनिक आणि सुसज्ज रूप देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प एक ऐतिहासिक पाऊल मानले जात आहे.


वर्षानुवर्षे प्रवासी आणि नागरिकांना दिलासा देणारे पण कालानुरूप जीर्ण झालेले जुने बस स्थानक आता नव्या, अत्याधुनिक सुविधांसह पुन्हा उभे राहणार आहे. या पुनर्बांधणीसाठी शासनाकडून ५ कोटी निधी मंजूर करण्यात आला असून, काम लवकरच पूर्णत्वास नेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.



या नवीन बस स्थानकात प्रशस्त प्रेक्षागृह, प्रवाशांसाठी अत्याधुनिक प्रतीक्षालय, स्वच्छतागृहे, माहिती कक्ष, इलेक्ट्रॉनिक तिकिटिंग प्रणाली, सीसीटीव्ही सुरक्षा यंत्रणा, सौरऊर्जेवर आधारित वीजपुरवठा, तसेच दिव्यांगांसाठी सुलभ प्रवेश सुविधा अशा अनेक आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. यामुळे हिंगणघाट शहरातील प्रवासी अनुभव अधिक सुरक्षित, सुलभ आणि आरामदायी होणार आहे.


याच कार्यक्रमादरम्यान हिंगणघाट बस स्थानकाला एक अतिरिक्त बस देऊन तिचे लोकार्पण सुद्धा करण्यात आले. या नव्या बसच्या समावेशामुळे शहरातील प्रवासी वाहतुकीची सोय अधिक सुलभ आणि सक्षम होणार आहे.



या भूमिपूजन सोहळ्याला माजी खासदार श्री. रामदासजी तडस, माजी नगराध्यक्ष श्री. प्रेमबाबू बसंतानी प्रादेशिक व्यवस्थापक नागपूर प्रदेश श्री. श्रीकांत गभणे, कार्यकारी अभियंता नागपूर प्रदेश श्रीमती शितल गौंड, यंत्र अभियंता वर्धा विभाग श्री. प्रतापसिंग राठोड, वरिष्ठ संख्यांकिक अधिकारी नागपूर प्रदेश श्री. किशोर आदमने, ठाणेदार श्री. अनिल राऊत, वानखेडे मॅडम, कोसरे मॅडम, श्री. सुधीर गुल्हाने, लोणे मॅडम, उजवणे मॅडम, विविध मान्यवर, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीत या प्रकल्पाबद्दल प्रचंड उत्साह आणि समाधान व्यक्त करण्यात आले. हिंगणघाट शहर हे वर्धा जिल्ह्याच्या वाहतूकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे. या पुनर्बांधणीमुळे केवळ प्रवासी सुविधा वाढणार नाहीत, तर शहराचे सौंदर्य आणि ओळखही अधिक उंचावेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या