![]() |
| राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाची आढावा बैठक |
सचिन हाडके
जिल्हा प्रतिनिधी
आज हिंगणघाट येथे आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकिंच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले, जेष्ठ नेते सुनील राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्याची आढावा बैठक सपन्न झाली.
या बैठकीत हिंगणघाट तालूका, समुद्रपूर तालूका, सिंदी रेल्वे येथील पदाधिकाऱ्यांचा आढावा घेण्यात आला. हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील पक्षाची सध्याची स्थिती, संघटनात्मक रचना तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तयारीबाबत सखोल चर्चा करण्यात आली.
या बैठकीदरम्यान वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी मुक्त संवाद साधला, सर्वांना संघटन मजबूत करण्यासाठी मार्गदर्शन केलं आणि पुढील निवडणुकीसाठी उत्साहानं कामं करण्याचं आवाहन केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यावर मला विश्वास आहे की, ते जनतेच्या मनात आपली छाप उमटवतील आणि पक्ष अधिक बळकट करतील.
या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते,सर्व प्रमुख पदाधिकारी तसेच राष्ट्रवादी च्या विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या