Type Here to Get Search Results !

निवृत्तीवेतन धारकांना हयातीचा दाखला सादर करण्याचे आवाहन



         सचिन हाडके 

     जिल्हा प्रतिनिधी

वर्धा. दि.3 जिल्हा कोषागार कार्यालय वर्धा येथून निवृत्तीवेतन घेत असलेल्या सर्व महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेले अधिकारी व कर्मचारी निवृत्तीवेतनधारक व कुटूंब निवृत्तीवेतन धारकांनी दि.30 नोव्हेंबर पर्यंत हयातीचा दाखला सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


जे निवृत्तीवेतन धारक, कुटूंब निवृत्तीवेतन धारक दि.30 नोव्हेंबर पर्यंत त्यांचा हयातीचा दाखला सादर करणार नाहीत, त्यांचे डिसेंबर महिन्याचे निवृत्तीचे वेतन स्थगित करण्यात येईल. निवृत्ती वेतन धारकांची अद्याक्षरनिहाय यादी त्यांच्या संबंधीत बँक शाखांकडे पाठविण्यात आली आहे. निवृत्तीवेतन धारक ज्या बँकेतून निवृत्तीवेतन घेतात त्या शाखेत नमुद कालावधीत हजर राहून यादीतील त्यांच्या नावासमोर शाखा व्यवस्थापकांसमोर साक्षरी करुन आपला मोबाईल क्रमांक, पॅन क्रमांक, आधार क्रमांक नमुद करावा.

सदर यादी दि.30 नोव्हेंबर पर्यंत बँकेत उपलब्ध राहील. तसेच ज्या कुटूंब निवृत्तीवेतन धारकांचे वय 80 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक असेल त्यांनी आपल्या वयाचा पुरावा म्हणुन जन्म तारखेचा दाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड तसेच पासबुकची छायांकित प्रत कोषागार कार्यालयास सादर करावेत जेणेकरुन त्यांना वाढीव निवृत्तीवेतन अदा करणे शक्य होईल, असे जिल्हा कोषागार अधिकारी यांनी कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या