अमोल शेलवटकर
जिल्हा प्रतिनिधी
जागतिक दिव्यांग दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा करण्यात येतो यामुळे दिव्यांगाणं मध्ये असलेल्या कला गुनाला चालना मिळते हा दिवस दिव्यांगाण करीता उत्सवाचा व आनंदाचा दिवस असतो दिव्यांगना समान संधी व हक्क शासनाने दिले आहे त्याचे पालन होणे आवशयक असून दिव्यांगांना शासन सर्वतोपरी मदत करण्यास तत्पर आहे आज सम्पन्न होणाऱ्या जिल्हास्तरीय क्रीडा दिव्यांगांना मध्ये ऊर्जा निर्माण करून त्यांच्यातील कलागुणाला चालना मिळेल असे आपल्या मार्गदर्शन भाषणातून वान्मथि सी ,जिल्हाधिकारी म्हणाल्या,
दिनांक 7/12/2025 रोजी जागतिक दिव्यांग दिनानिमित्य जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन जिल्हातील दिव्यांगांच्या शाळेतील दिव्यांग स्पर्धकांन करीता दिव्यांग मंत्रालय, दिव्यांग आयुक्तालय पुणे,समाजकल्याण कार्यालय जिल्हा परिषद वर्धा,व जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करन्यात आल्या होत्या,या प्रसंगी क्रीडा स्पर्धेच्या उदघाटक वान्मथि सी, जिल्हाधिकारी,तसेच पराग सोमण मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वर्धा,डॉ सतीश नागलवाडे सामान्य रुघणालय वर्धा,प्रतिभा भागवतकर जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी जिल्हा परिषद वर्धा,सोनाली शिंदे दिव्यांग विभाग सहायक सल्लागार,दिलीप वायरे सहायक लेखाधीकारी या प्रसंगी उपस्थित होते,या प्रसंगी ध्वजारोहन व मशाल मैदानात फीरविण्यात आली दिव्यांगानच्या क्रीड़ा स्पर्धेला हिरवी झेंडी मा वान्मथि सी ,जिल्हाधिकारी यांनी दाखविली व स्पर्धा सुरू करण्यात आल्या, या प्रसंगी कार्यक्रमाची प्रस्तविका प्रतिभा भागवतकर जिल्हा सक्षमीकरण अधिकारी यांनी मांडली तर कार्यक्रमाचे अध्यक्ष पराग सोमन मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वर्धा यांनी मार्गदर्शन केले तसेच डॉ नागलवडे सामान्य रुघणालय वर्धा यांनी सुद्धा मार्गदर्शन केले, या कार्यक्रमाचे संचालन डॉ नरेंद्रकुमार कांबळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रकाश नरवरे यांनी मानले या जिल्हास्तरीय स्पर्धेत गतिमंद,दृष्टी बाधित, मूकबधिर, इत्यादी प्रवर्गाच्या स्पर्धा घेण्यात आल्या असून या स्पर्धेत शंभर,दोनशे मीटर धावणे,पळत येऊन लांब ऊडी, स्पॉट जम्प,गोळा फेक,बुद्धीबळ,पोहनी इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या,या जिल्हास्तरीय स्पर्धेत जो स्पर्ध प्रथम क्रमांक मिळवतील ते स्पर्धक राज्यस्तरीय स्पर्धेत भाग घेतील , या स्पर्धेच्या येशस्वीते करीता कीशोर थुल,विना शेंडे,कार्यालयीन अधीक्षक,मरापे,माधुरी गवई समाजकल्यानं निरीक्षक,अनिल विघ्ने,महेंद्र जाधव,देवीदास,राजू वाघमारे ,विद्यानंद हडके,देवीदास दोरलीकर,ज्योती लोखाडे, व सर्व दिव्यांग शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक कर्माचारी यांनी सहकार्य केले असून या स्पर्धेत दिव्यांग विध्यार्थी उत्सवात सहभागी झाले होते,


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या