स्थळ : प्रभाग क्र. ०६ — श्री. रविन्द्र रोहणकर यांच्या निवासस्थानासमोरील चौक, संत तुकडोजी वॉर्ड, हिंगणघाट
सचिन हाडके
जिल्हा प्रतिनिधी
सभेमध्ये कार्यसम्राट आमदार मा. श्री. समीरभाऊ कुणावार यांनी हिंगणघाट शहरात मागील काही वर्षांत अभूतपूर्व वेगाने पूर्ण झालेल्या विकासकामांचा आढावा घेत, जनहितासाठी राबविण्यात आलेल्या योजनांची नगरपरिषदेमार्फत झालेली परिणामकारक अंमलबजावणी अधोरेखित केली. भूतो न भविष्यती अशा रूपाने शहराचा कायापालट झाल्याचे त्यांनी स्पष्ट शब्दांत नमूद केले.
सभेला संबोधित करताना मीही नागरिकांसमोर माझी भूमिका स्पष्टपणे मांडली —
नगराध्यक्ष पदाच्या माझ्या उमेदवारीमुळे, आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या विकासदृष्ट्या विचारांना आणि शहराच्या प्रगतीसाठी त्यांनी आखून दिलेल्या मार्गदर्शक संकल्पनांना खांद्याला खांदा लावून पुढे नेण्याचा माझा ठाम निर्धार आहे.
शैक्षणिक क्षेत्रात केलेली माझी दीर्घकालीन कामगिरी, पारदर्शक प्रशासनाची माझी तत्त्वनिष्ठ भूमिका आणि नागरिकांशी असलेली जिव्हाळ्याची बांधिलकी — हे सर्व मी हिंगणघाटच्या विकासासाठी अर्पण करणार असल्याचे आश्वासन दिले.
या सभेला प्रभाग ०६ मधील नागरिकांनी अभूतपूर्व उत्साहाने साथ दिली. त्यांच्या या प्रचंड प्रतिसादातून — बदलाच्या नव्या पहाटेची चाहूल आणि विकासाच्या निर्णायक विजयाचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे जाणवले.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या