Type Here to Get Search Results !

भारतीय जनता पक्षाच्या प्रचार कार्यालयाचे आज उद्घाटन पार पडले



       सचिन हाडके 

      जिल्हा प्रतिनिधी

हिंगणघाट नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन माझ्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडले. स्थानिक नागरिक, महिला, युवा कार्यकर्ते तसेच ज्येष्ठ पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला विशेष उर्जा  देण्याचे काम पूर्ण केले असे उद्गार कार्यसम्राट समीर कुणावर यांनी बोलताना व्यक्त केले.


निवडणूक प्रचार कार्यालय हे केवळ निवडणुकीचे केंद्र नसून कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन, रणनीती आखणी, जनसंपर्क आणि मतदारांशी थेट संवाद साधण्याचे महत्त्वपूर्ण माध्यम आहे. हिंगणघाटच्या सर्वांगीण विकासासाठी, सुशासनासाठी आणि नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पक्ष कटिबद्ध असल्याचा दृढ विश्वास आम्ही व्यक्त करतो असेही म्हणालेवैभव


या कार्यक्रमाचे आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे श्री. वैभव साटोने, साहिल कपूर व डॉ. मुकुल चंदुभाऊ मावळे यांच्या सोबत ऊर्जावान तरुणांनी भारतीय जनता पक्षावर विश्वास ठेवत गोलू मडावी, अनिकेत येळणे, धनंजय क्षीरसागर, सौरभ कोल्हे, निलेश महाकाळकर, अमित तितरे, हर्षल कपूर, विनोद काटोले, अमित चंदेल, निखिल साटोणे, मनोज येणोरक आधी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या