- इन्टॅक कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय समर्थ यांची आक्रमक भूमिका; जिल्हाधिकारी व सीईओंनी कारवाईची मागणी
- पीडित शिक्षकाच्या तक्रारीवरून मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
गडचिरोली :
उच्च न्यायालयाचे व शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशाचे जाणीवपूर्वक उल्लंघन करणाऱ्या मुख्याध्यापक राजेश ढुमणे यांच्यावर जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांनी तातडीने कठोर प्रशासकीय कारवाई करावी, अशी आक्रमक मागणी इन्टॅक (INTUC) कामगार संघटनेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष दत्तात्रय समर्थ यांनी केली आहे.
मागील १५ दिवसांपासून आपल्या रास्त मागण्यांसाठी पीडित शिक्षक दिलीप नैताम हे गडचिरोली जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषणाला बसले असून, आज या उपोषणाचा १६ वा दिवस आहे. मात्र, प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस दखल घेतली गेली नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
पोलिसांनी गुन्हा दाखल करावा
मुख्याध्यापक राजेश ढुमणे यांनी न्यायालयाच्या आदेशाला आणि शिक्षणाधिकाऱ्यांच्या निर्देशाना सातत्याने केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे गडचिरोलीच्या पोलीस अधीक्षकांनी शिक्षक दिलीप नैताम यांनी सादर केलेल्या अधिकृत तक्रारीची तातडीने दखल घेऊन संबंधित मुख्याध्यापकावर तात्काळ गुन्हा (FIR) दाखल करावा, अशी मागणीही दत्तात्रय समर्थ यांनी केली आहे.
शिष्टमंडळ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटीला
या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत आज इन्टॅक कामगार संघटनेचे एक विशेष शिष्टमंडळ न्याय मिळवून देण्यासाठी गडचिरोलीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटीला रवाना झाले असून, प्रशासनाला निवेदन सादर केले जाणार आहे. पीडित शिक्षक दिलीप नैताम यांना लवकरात लवकर न्याय मिळाला नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
संपादकीय टीप/संपर्क:
- बातमीदार: अर्पित वाहाणे
- संपर्क क्रमांक: ८९५६६४७००४

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या