सचिन हाडके
जिल्हा प्रतिनिधी
पोलीस अधीक्षक वर्धा श्री. सौरभ कुमार अग्रवाल या यांनी अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणारे गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेस आदेशीत केल्याने, त्या अनुषंगाने अंमली पदार्थांची विक्री करणा-या गुन्हेगारांवर कारवाई करण्याची स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहिम राबविली असुन, दि. 26 डिसेंबर 2025 रोजीचे रात्री दरम्यान स्था.गु.शा. वर्धा चे पथक पोलीस स्टेशन हिंगणघाट हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना, त्यांना मिळालेल्या गोपणीय माहितीवरून संत ज्ञानेश्वर वार्ड शहालंगडी रोड हिंगणघाट येथील लोकेश मेघराज तांदुळकर याचे किरायाचे रूममवर एन.डी.पि.एस. कायद्याचे तरतुदींचे तंतोतंत पालन करून रेड केला असता, तेथे लोकेश तांदुळकर हा हजर मिळुन आला असुन, पंचासमक्ष कायदेशीररित्या त्याचे राहते रूमची झडती घेतली असता, झडती दरम्यान एका पन्नीमध्ये गांजा अंमली पदार्थ मिळुन आला. सदरचा माल हा त्याचे स्वतःचे मालकिचा असुन, तो त्यास पारितोश चौधरी रा. संत ज्ञानेश्वर वार्ड हिंगणघाट याने आणल्याचे सांगितले. नमुद दोन्ही आरोपी हे संगणमताने गांजा अंमली पदार्थाची तस्करी करून विक्री करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने, आरोपीचे ताब्यातुन 511 ग्रॅम गांजा अंमली पदार्थ मोबाईलसह जु.कि. 25,220 रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन, दोन्ही आरोपीतांविरूध्द पो.स्टे. हिंगणघाट येथे एन.डी.पि.एस. कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल , अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी, पो.उपनि. प्रकाश लसुंते, पो.अं अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, रवि पुरोहित,अभिषेक नाईक,विनोद कापसे सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या