सचिन हाडके
जिल्हा प्रतिनिधी
आज दि. 5 नोव्हेंबर 2025 रोजी गुरुनानक देवजींच्या 556 व्या जयंतीनिमित्त हिंगणघाट मध्ये उत्साहात साजरी करण्यात आली शहरात विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. शहरातील गुरुनानक वार्ड, सिंदी कॉलनी येथे मुख्य कार्यक्रम पार पडला, ज्यात मोठ्या संख्येने नागरिक, समाजसेवक, तरुण, वयोवृद्ध व महिलांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. व गुरुनानक देवजी यांच्या 556 व्या जयंतीचा जल्लोष साजरा केला
कार्यक्रमाची सुरुवात प्रभातफेरीने करण्यात आली. ज्यामध्ये श्रद्धाळूंनी “वाहेगुरूजी का खालसा, वाहेगुरूजी की फतेह” या जयघोषांसह शहरातील प्रमुख मार्गांवरून रॅली काढण्यात आली.
याशिवाय सिंदी कॉलनी परिसरात आयोजित मुख्य सोहळ्यात शहरातील मान्यवर, लोकप्रतिनिधी आणि विविध धार्मिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच उपस्थितांनी विविध ठिकाणी आयोजित लंगर व रक्तदान शिबिरांना भेट देऊन या सेवाभावी उपक्रमांचा लाभ घेतला


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या