सचिन हाडके
जिल्हा प्रतिनिधी
हिंगणघाट आज बुधवार दिनांक 5 नोव्हेंबर 2025 कार्तिक पौर्णिमा बौद्ध संस्कृतीनुसार कात्तिक पूण्णमा
अर्थात कार्तिक महिन्याचा शेवटचा दिवस (महा प्रवरणा महोत्सव दिवस) बौद्ध समण परंपरेनुसार कठीण चिवरदान महोत्सव साजरा करण्याचा हा शेवटचा दिवस या दिवशी बौद्धजन उपोसथ व्रत धारण करून आपल्या काया -वाचा -मनाने कुठल्याही प्रकारचे अनैतिक कार्य न घडावे व मंगलच मंगल कार्य घडावे या उदाक्त हेतू ने उपोसथ नियम पाळतात.
या मंगल दिनाचे औचित्य साधून सावित्रीच्या लेकी चॅरिटेबल ट्रस्ट, हिंगणघाट जे सामाजिक व धार्मिक कार्यासह शैक्षणिक मुलांकरिता आर्थिक मदत करतात या ट्रस्टच्या वतीने सिद्धार्थ नगर, हिंगणघाट येथील द सिम्बॉल ऑफ नॉलेज डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय यांस स्पर्धा परीक्षेची तैयारी करणाऱ्या तसेच आवश्यकता नुसार विद्यार्थ्यांना लागणारे पुस्तके विकत घेऊन विद्यार्थ्यांची शिक्षणाची भूक भागवन्याच्या उद्देशाने तसेच वाचनालय संचालक मंडळाला आर्थिक मदत करण्याचा उद्देशाने ५०००/- रु. धनादेश प्रदान केला.
वा.सं.मं.च्या वतीने धन्यवाद केले.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या