सचिन हाडके
जिल्हा प्रतिनिधी
हैदराबाद राष्ट्रीय मार्गावरील कोल्ली शिवारात ट्रकने टू व्हीलर ला धडक दिल्याची घटना समोर आली टू व्हीलर वरील बाप लेक गंभीर जखमी झाले. या प्रकरणात समुद्रपूर ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहगाव येथील रहिवाशी सतीश सातपुते वय ५५ वर्ष व त्यांचा मुलगा रूपेश वय २४ वर्ष हे दोघे त्यांचे नातेवाईक पंकज सातपुते यांची एम. एच. ३२ एस. २३२१ क्रमांका च्या दुचाकीने हिंगणघाट ला जात होते. कोल्ही शिवारात विरुद्ध दिशेने येणार्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात सतीश व रुपेश हे दोघेही जागीच गंभीर जखमी झाले. अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले त्यानंतर सेवाग्रामला हलविण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने नंतर नागपूर येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे दोघांवर उपचार सुरू असून या अपघातात सतीश सातपुते यांचा एक पाय निकामी झाला. पंकज सातपुते यांच्या तक्रारीवरून स्थानिक समुद्रपूर पोलिस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या