Type Here to Get Search Results !

प्रभाग ८ मध्ये सामना रंगणार! वैशालीताई अमन काळे यांच्या उमेदवारीने वाढल्या अपेक्षा



      सचिन हाडके

    जिल्हा प्रतिनिधी 

हिंगणघाट

प्रभाग क्रमांक ८ महात्मा फुले वार्ड, काजी वार्ड, शिवाजी वार्ड, तसेच सिंधी कॉलनी  परिसर मधून SC राखीव महिला या गटातून वैशालीताई अमन काळे  यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून, त्यांच्या प्रवेशामुळे प्रभागातील राजकीय वातावरणात चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. स्थानिक नागरिकांमध्ये त्यांच्या उमेदवारीची चर्चा रंगली असून, अनेकांकडून त्यांचे स्वागत करण्यात आले आहे.

 वैशालीताई अमन काळे  या गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. महिलांच्या स्वावलंबनासाठी त्यांनी घेतलेल्या उपक्रमांमुळे त्यांची ओळख एक समाजभिमुख कार्यकर्त्या म्हणून झाली आहे. परिसरातील वंचित घटक, विधवा महिलांना आर्थिक आधार, तसेच शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरण विषयक मोहिमांमध्ये त्यांचा नेहमीच पुढाकार राहिला आहे.

सामाजिक बांधिलकी आणि विकासकामांचा ध्यास घेतला की बदल घडवता येतो या विचारावर वैशालीताई अमन काळे  काम करतात. त्यांच्या कार्यशैलीमुळे त्यांच्याबद्दल प्रभागात सकारात्मक भावना निर्माण झाली आहे. अनेक तरुण आणि महिला कार्यकर्त्या त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या आहेत.

प्रभाग ८ मध्ये आधीच विविध पक्षांच्या संभाव्य उमेदवारांनी तयारी सुरू केली असून, वैशालीताई काळे  यांच्या आगमनामुळे या निवडणुकीतील सामना अधिक रंगतदार होणार असल्याचे स्थानिक राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. नागरिकांना आता आपल्या प्रभागाच्या विकासासाठी कोणत्या उमेदवारावर विश्वास दाखवायचा, याची उत्सुकता लागली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या