चंद्रपूर (प्रतिनिधी) :
चंद्रपूर जिल्ह्यातून प्रकाशित होणाऱ्या साप्ताहिक “जागृती हेच ध्येय” या पत्रकाच्या दिवाळी विशेषांकाचे भव्य प्रकाशन तसेच संपादक श्री. तुलसीराम हनुमानजी जांभुलकर यांच्या 54 व्या वाढदिवसानिमित्त एक उत्साहपूर्ण सोहळा व्हीआयपी शासकीय विश्रामगृह, नागपूर रोड, चंद्रपूर येथे पार पडला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन माहिती अधिकार संघटना, पत्रकार संघ आणि पोलिस मित्र संघटनेचे पदाधिकारी श्री. किशोरभाऊ मुटे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रफुल्लभाऊ क्षीरसागर व भाऊरावजी कोटकर होते. मान्यवरांच्या उपस्थितीत दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी बोलताना अतिथींनी “जागृती हेच ध्येय” या साप्ताहिकाच्या सामाजिक भान जागविणाऱ्या कार्याचे व संपादक श्री. तुलसीराम जांभुलकर यांच्या सातत्यपूर्ण पत्रकारितेचे मनापासून कौतुक केले. समाजातील समस्यांवर प्रकाश टाकत लोकांमध्ये जागृती निर्माण करणे हे या पत्रकाचे ध्येय असून, ते यापुढेही जनतेचा आवाज बनून राहील, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
कार्यक्रमानंतर वाढदिवसानिमित्त केक कापून श्री. जांभुलकर यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. उपस्थित मान्यवर, पत्रकार व समाजातील विविध क्षेत्रातील व्यक्तींनी मोठ्या संख्येने सहभाग घेत कार्यक्रम यशस्वी केला.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या