Type Here to Get Search Results !

वर्धा बस स्थानक येथे ई-शिवाय वातानुकूलित बसचा लोकार्पण सोहळा संपन्न



      सचिन हाडके

    वर्धा जिल्हा प्रतिनिधी 

      

वर्धा बसस्थानक येथे ई-शिवाई वातानुकूलित बसचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. या नव्या सेवेमुळे वर्धा शहरातील प्रवाशांना आधुनिक, सुरक्षित व पर्यावरणपूरक प्रवासाचा नवा अनुभव मिळणार आहे.


या लोकार्पणप्रसंगी ई-शिवाई वातानुकूलित बसचा वर्धा बसस्थानक ते सिव्हिल हॉस्पिटल या मार्गावर प्रत्यक्ष प्रवास करून पाहण्यात आला. स्वतः या बसमधून प्रवास करताना बसमधील आरामदायी आसनव्यवस्था, वातानुकूलन सुविधा, स्वच्छता, शांत व धूरमुक्त प्रवासाचा अनुभव समाधानकारक असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.





ई-शिवाई ही पूर्णपणे इलेक्ट्रिक बस असून ती पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. प्रदूषणमुक्त, कमी आवाजात चालणारी आणि प्रवाशांसाठी सोयीस्कर असलेली ही बस शहरी वाहतुकीसाठी एक नवा मानदंड ठरणार आहे. या उपक्रमामुळे इंधन खर्चात बचत होण्यासोबतच कार्बन उत्सर्जनातही लक्षणीय घट होणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या या उपक्रमामुळे सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम, आधुनिक आणि प्रवाशाभिमुख होत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येते. भविष्यात अशाच अधिक ई-शिवाई बस सेवा सुरू होऊन सामान्य नागरिकांना दर्जेदार प्रवासाची सुविधा मिळावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. यावेळी मा. श्री. सुधीरजी पांगुळ नगराध्यक्ष, भाजप माजी वर्धा जिल्हाध्यक्ष श्री. सुनिलजी गफाट, श्री. अभिषेकजी त्रिवेदी, नगरसेवक, सौ. मोहिनी आडे, नगरसेविका, शिवसेनेचे गणेश इखार व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या