Type Here to Get Search Results !

हिंगणघाट पोलिसांची मोठी कारवाई; साडेचार लाखांचा अवैध दारूसाठा जप्त ​हिंगणघाट:

 

हिंगणघाट पोलिसांची मोठी कारवाई; साडेचार लाखांचा अवैध दारूसाठा जप्त




  सचिन हाडके
जिल्हा प्रतिनिधी

हिंगणघाट:

शहरातील संत तुकडोजी वार्ड परिसरात राहत्या घरातून अवैध दारूचा पुरवठा करणाऱ्या एका आरोपीला हिंगणघाट पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून ४ लाख ६४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई २९ डिसेंबर रोजी करण्यात आली.

नेमकी घटना काय?

​हिंगणघाट पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण पथक (DB) परिसरात पेट्रोलिंग करत असताना, त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, दीक्षित उर्फ गुटली मिलिंद भगत (रा. संत तुकडोजी वार्ड) हा आपल्या राहत्या घरी दारूचा साठा करून मोपेड गाडीने किरकोळ विक्रेत्यांना दारूचा पुरवठा करत आहे.

​पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आरोपीच्या घरावर छापा टाकला. घरझडती दरम्यान पोलिसांना मोठ्या प्रमाणात देशी व विदेशी दारूचा साठा मिळून आला.

जप्त केलेला मुद्देमाल:

​१) देशी दारू (कोकण ॲग्रो): २७ खोक्यांमध्ये एकूण २,७०० बाटल्या (किंमत ३,२४,००० रुपये).

२) रॉकेट संत्रा: २०० बाटल्या (किंमत २४,००० रुपये).

३) विदेशी दारू (रॉयल स्टॅग): ४८ बाटल्या (किंमत १६,८०० रुपये).

४) होन्डा डिओ मोपेड (MH 32 AR 6917): वाहतुकीसाठी वापरलेली गाडी (किंमत १,००,००० रुपये).

एकूण जप्त मुद्देमाल: ४,६४,८०० रुपये.

यांनी केली कारवाई:

​सदर कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक व पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांच्या आदेशानुसार करण्यात आली.

​या मोहिमेत डीबी पथकाचे प्रमुख सपोनि पद्माकर मुंडे, पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, किशोर कडू, जगदीश चव्हाण, राजेश शेंडे, आशिष नेवारे, मंगेश वाघमारे आणि रोहीत साठे यांचा समावेश होता. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि पद्माकर मुंडे करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या