Type Here to Get Search Results !

Vanchit Varta 24 news

Vanchit Varta 24 news

हिंगणघाट: आमदार समीर कुणावार यांच्या कार्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

 

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्यामुळेच महिलांना शिक्षणाचा हक्क मिळाला - आ. समीर कुणावार


हिंगणघाट येथे आमदार जनसंपर्क कार्यालयात जयंती सोहळा उत्साहात संपन्न

हिंगणघाट (प्रतिनिधी - अश्विन बोंदाडे):

महिलांच्या सामाजिक, शैक्षणिक व वैचारिक सशक्तीकरणासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी दिलेले योगदान अनमोल आहे. त्यांच्या अखंड संघर्षामुळेच आज महिलांना शिक्षण आणि समानतेचा हक्क प्राप्त झाला आहे, असे गौरवपूर्ण प्रतिपादन आमदार समीर कुणावार यांनी केले.

​स्थानिक आमदार समीर कुणावार यांच्या जनसंपर्क कार्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते उपस्थितांशी संवाद साधत होते. कार्यक्रमाला नवनियुक्त नगराध्यक्ष डॉ. नयना तुळसकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

मान्यवरांच्या हस्ते अभिवादन

​कार्यक्रमाच्या सुरुवातीला आमदार समीर कुणावार व नगराध्यक्ष डॉ. नयना तुळसकर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी "क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अमर रहे" अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.

महिला पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती

​याप्रसंगी जिल्हा महिला मोर्चा सरचिटणीस रवीला आखाडे, जिल्हा कार्यकारणी सदस्य अनिता मावळे, भाजपा महिला शहराध्यक्ष शारदा पटेल, महिला तालुकाध्यक्ष कीर्ती सायंकार, कौसर अंजुम, प्रेमीला हीवंज, उमा पानवटकर, वंदना कामडी, पल्लवी कामडी यांच्यासह नवनियुक्त नगरसेविका प्राची प्रसाद पाचखेडे, अश्विनी मानेकर, प्रतिभा पडोळे, कविता सलामे, मंगलाताई कुमरे, सुचिता सातपुते व मीना सोनटक्के उपस्थित होत्या. तसेच समुद्रपूर ग्रामीण महिला अध्यक्षा विजया तेलरांधे व इतर मान्यवरांचीही उपस्थिती होती.

प्रगतीचा संकल्प

​सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि महिलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प यावेळी सर्व उपस्थित महिलांनी व्यक्त केला. कार्यक्रमाला भाजपा महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या