लोकहितासाठी 'वंचित'ची सकारात्मक पाऊले; उल्हासनगरच्या विकासासाठी नगरसेवकांचा उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा"सत्ता कोणाचीही असो, विकास जनतेचाच झाला पाहिजे"; सुरेखा सोनावणे आणि विकास खरात यांची विकासाभिमुख भूमिका
प्रतिनिधी : अमोल जाधव (मुंबई पूर्व)
उल्हासनगर : आपल्या प्रभागातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि विकासकामांचा डोंगर उभा करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांनी सकारात्मक पाऊल उचलले आहे. उल्हासनगरमधील वंचितचे नगरसेवक विकास खरात आणि नगरसेविका सुरेखा सोनावणे यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आपल्या भागातील 'दलित वस्ती सुधार योजने'सह अन्य विकासकामांसाठी पाठिंबा जाहीर केला आहे.
राजकारण बाजूला ठेवून विकासाला प्राधान्य
वंचित बहुजन आघाडीची भूमिका नेहमीच तळागाळातील लोकांच्या हक्कासाठी राहिली आहे. याच भूमिकेला पुढे नेत, सोनावणे आणि खरात यांनी आपल्या प्रभागाचा कायापालट करण्यासाठी सत्तेचा योग्य वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ विरोधाला विरोध न करता, "जनतेची कामे मार्गी लागणे महत्त्वाचे" हा उदात्त विचार ठेवून त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे.
- निधीचा ओघ वाढणार: या निर्णयामुळे वंचितच्या प्रभागांमध्ये आता राज्य सरकारचा मोठा निधी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
- दलित वस्ती सुधारणेवर भर: प्रलंबित असलेल्या दलित वस्ती सुधार योजना आता प्राधान्याने पूर्ण होतील.
- विकासाचे मॉडेल: नगरसेवकांनी स्वतः पुढाकार घेऊन मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी धाव घेतल्याने, त्यांच्या कार्यतत्परतेचे कौतुक होत आहे.
या भेटीदरम्यान केवळ पाठिंबाच दिला नाही, तर आपल्या प्रभागातील कामांची यादीच त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासमोर मांडली. यावेळी आमदार डॉ. बालाजी किणीकर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
ही घडामोडी म्हणजे पक्षांतर नसून, आपल्या मतदारांना दिलेला शब्दा पूर्ण करण्यासाठी नगरसेवकांनी दाखवलेली 'मुत्सद्देगिरी' आणि 'विकासवादी दृष्टी' असल्याचे बोलले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या