हिंगणघाट: मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्या दोघांवर पोलिसांची कारवाई
हिंगणघाट (प्रतिनिधी): सचिन हाडके
शहरातील वाहतूक शिस्त आणि रस्ते सुरक्षा जपण्यासाठी उपजिल्हा वाहतूक शाखा, हिंगणघाट यांच्या वतीने आज (१९ जानेवारी) एक विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या दोन दुचाकीस्वारांवर 'मोवाका १८५' अन्वये गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाहतूक पोलिसांनी संशयास्पद वाटणाऱ्या वाहनांची तपासणी केली असता, दोन चालक मद्यधुंद अवस्थेत आढळून आले. यात खालील व्यक्तींचा समावेश आहे:
१. शाहरूख अली खुर्शीद अली सय्यद (३२ वर्ष)
- राहणार: शास्त्री वार्ड, हिंगणघाट.
- वाहन क्रमांक: एम.एच. ३४ एच. ५०४५
२. आदित्य सनातन डवले (१९ वर्ष)
- राहणार: तास, ता. समुद्रपूर, जि. वर्धा.
- वाहन क्रमांक: एम.एच. ३१ सी.जे. ७७७१
या दोन्ही दुचाकी चालकांविरुद्ध हिंगणघाट पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ही कारवाई उपजिल्हा वाहतूक शाखा हिंगणघाटचे पोलीस उपनिरीक्षक शरद आवारे, पोलीस हवालदार भोयर, वानखेडे आणि पोलीस शिपाई प्रदीप दातारकर यांच्या पथकाने केली.
रस्त्यावरील अपघात रोखण्यासाठी आणि मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांना जरब बसवण्यासाठी अशी कारवाई यापुढेही सुरू राहील, असा इशारा वाहतूक विभागाने दिला आहे.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या