Type Here to Get Search Results !

Vanchit Varta 24 news

Vanchit Varta 24 news

वर्धा बसस्थानकासमोरील खड्डे ८ दिवसांत बुजवा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा AIMIM चा इशारा

 


सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले निवेदन; नवरात्र व दिवाळीपूर्वी तातडीने दुरुस्तीची मागणी

वर्धा (विशेष प्रतिनिधी, अर्पित वाहाणे):

वर्धा शहरातील बसस्थानकासमोरील मुख्य रस्त्यावर डिव्हायडरला लागून असलेल्या मोकळ्या जागेत पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालक व नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या ठिकाणी अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली असून, एसटी बसच्या ये-जा करण्यासही मोठा अडथळा निर्माण होत आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी AIMIM च्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी उपअभियंत्यांना निवेदन सादर करून खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी करण्यात आली आहे.

​दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, आगामी काळात नवरात्रोत्सव, दसरा व दिवाळी या मोठ्या सण-उत्सवांमुळे या मार्गावर वाहतुकीचा ताण प्रचंड वाढणार आहे. प्रवाशांच्या आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रस्त्यावरील हे मोठे खड्डे पुढील ८ दिवसांच्या आत 'पॅचवर्क' करून तातडीने बुजवणे अत्यंत गरजेचे आहे.

८ दिवसांचा अल्टिमेटम

​AIMIM चे वर्धा जिल्हाध्यक्ष आसिफ खान यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की, “येत्या ८ दिवसांच्या आत खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण न झाल्यास AIMIM च्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल. या दरम्यान उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी संबंधित विभागाची राहील.”

​निवेदन देताना AIMIM चे जिल्हाध्यक्ष आसिफ खान यांच्या मार्गदर्शनाखाली सोशल मीडिया प्रमुख आवेज शेख, वर्धा शहर सचिव राजिक खान, शेरू भाई आणि इरफान शेख प्रामुख्याने उपस्थित होते. नागरिकांच्या प्राणाशी खेळ थांबवून सार्वजनिक बांधकाम विभागाने यावर तातडीने कार्यवाही करावी, अशी जोरदार मागणी शहरात केली जात आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या