Type Here to Get Search Results !

Vanchit Varta 24 news

Vanchit Varta 24 news

नागोठणे जिल्हा परिषद गणातून मनसेचे साईनाथ धुळे इच्छुक; रोह्यात पार पडली महत्वपूर्ण बैठक

 

नागोठणे जिल्हा परिषद गणातून मनसेचे साईनाथ धुळे इच्छुक; रोह्यात पार पडली महत्वपूर्ण बैठक



रोहा (प्रतिनिधी/अमोल जाधव): आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रायगडमध्ये आपली मोर्चेबांधणी तीव्र केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार रोहा तालुक्याची एक महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत नागोठणे जिल्हा परिषद गणातून मनसेतर्फे साईनाथ धुळे यांच्या नावावर उमेदवारीसाठी शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.


​दक्षिण रायगड जिल्हा सचिव अमोल पेनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. यावेळी रोहा तालुक्यातील आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. नागोठणे गणात साईनाथ धुळे यांना तरुणांचा मोठा पाठिंबा मिळत असून, संघटन बांधणी आणि स्थानिक प्रश्नांची जाण या जोरावर मनसे ही निवडणूक मोठ्या ताकदीने लढवणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

​या बैठकीला मनसेचे विविध विभागांतील पदाधिकारी उपस्थित होते, त्यामध्ये प्रामुख्याने:

  • अमोल पेनकर (सचिव, दक्षिण रायगड जिल्हा)
  • साईनाथ धुळे (अध्यक्ष, रोहा तालुका मनसे)
  • सौ. दिपश्री गुरव-घासे (अध्यक्ष, रोहा तालुका महिला सेना)
  • नरेश भंडारी (विभाग अध्यक्ष, माथाडी सेना)
  • किशोर कापसे (रोहा तालुका उपाध्यक्ष)
  • प्रफुल्ल पाटील (विद्यार्थी सेना, रोहा तालुका)
  • महेश वाडकर (विभाग अध्यक्ष, धाटाव विभाग)
  • गोरखनाथ पारंगे (माजी तालुका उपाध्यक्ष)
  • रोशन बावकर (शाखा अध्यक्ष, वेलशेत)

​याशिवाय प्रभाकर तांडेल, रुपेश मोहिते, अंकुश पाटील, शशांत पारंगे, मनोज पारंगे, अर्जुन रॉय, जगदीश वाघमारे, कल्पेश मळेकर यांसह मोठ्या संख्येने महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

निवडणुकीचे रणशिंग फुंकले

​नागोठणे जिल्हा परिषद गणात सध्या मनसेची ताकद वाढताना दिसत आहे. कार्यकर्त्यांशी असलेला थेट संपर्क आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीमुळे आगामी निवडणुकीत नागोठणे गणात चौरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या बैठकीमुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य पसरले असून निवडणुकीच्या प्रचाराला आतापासूनच वेग येताना दिसत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या