Type Here to Get Search Results !

Vanchit Varta 24 news

Vanchit Varta 24 news

नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर आर्वी पोलिसांची मोठी कारवाई; ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त

 

नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर आर्वी पोलिसांची मोठी कारवाई; ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त


        सचिन हाडके 

आर्वी (जिल्हा प्रतिनिधी)

महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला नायलॉन मांजा बाळगल्याप्रकरणी आणि त्याची वाहतूक केल्याप्रकरणी आर्वी पोलिसांनी दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण ५५,६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर अवैध मांजा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी पोलिसांनी केलेल्या कारवाईत पीयुष विनायक टाकळे (वय २७) आणि विनायक गुलाबराव टाकळे (वय ५८, दोन्ही रा. रोहणा, ता. आर्वी) हे प्रतिबंधित नायलॉन मांजाची वाहतूक करताना आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडून ५५,६०० रुपयांचा साठा हस्तगत केला. याप्रकरणी आर्वी पोलीस स्टेशनमध्ये अपराध क्रमांक ३७/२५ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३, २९२ तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ आणि मोटर वाहन कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

न्यायालयाचे कडक ताशेरे आणि दंड

याच संदर्भात माननीय उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठाने १२ जानेवारी २०२६ रोजी नायलॉन मांजाबाबत कडक आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार:

  • पतंग उडवताना नायलॉन मांजा वापरल्यास: २५,००० रुपये दंड (अल्पवयीन असल्यास पालकांकडून दंड वसूल केला जाईल).
  • विक्री करताना आढळल्यास: २,५०,००० (अडीच लाख) रुपये दंड आकारला जाईल.
  • ​दंड न भरल्यास जमीन महसूल प्रक्रियेप्रमाणे वसुलीची कारवाई केली जाणार आहे.

​सदर कारवाई पोलीस निरीक्षक सतीश डेहनकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, नागरिकांनी नायलॉन मांजाचा वापर टाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आर्वी पोलिसांनी केले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या