कार्यकारी संपादक व प्रतिनिधी: आशिष अंबादे
हिंगणघाट : स्थानिक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील सौंदर्यीकरणाच्या कामात होत असलेली दिरंगाई आणि संथ गती लक्षात घेता, शिवसेना महिला आघाडीच्या वतीने नगरपालिकेला घेराव घालत निवेदन देण्यात आले. आगामी १४ एप्रिल रोजी होणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती लक्षात घेता, हे काम १० एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन मुख्याधिकारी व उपनगराध्यक्षांनी दिले आहे.
शिवसेना वर्धा जिल्हाप्रमुख (महिला आघाडी) सौ. शुभांगीताई ठमेकर आणि उपजिल्हाप्रमुख (हिंगणघाट विधानसभा) अमित गावंडे यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ मुख्याधिकारी मा. उरकुडे साहेब आणि उपनगराध्यक्ष मा. निलेशभाऊ ठोंबरे यांना भेटले.
प्रमुख मागण्या आणि चर्चा:
- कामात गती आणणे: आंबेडकर चौकातील सौंदर्यीकरणाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असून, यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
- जयंती उत्सवाचे गांभीर्य: १४ एप्रिल रोजी समाजबांधव व सामाजिक संघटना मोठ्या उत्साहात जयंती साजरी करतात. कामामुळे उत्सवात कोणताही व्यत्यय येऊ नये, ही प्रमुख मागणी करण्यात आली.
- मुदत: प्रशासनाने यावर सकारात्मक प्रतिसाद देत १० एप्रिल २०२६ पर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
बाळासाहेबांची प्रतिमा भेट
यावेळी वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शताब्दी वर्षानिमित्त शिवसेना पक्षातर्फे मुख्याधिकारी साहेबांना साहेबांची प्रतिमा सप्रेम भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
उपस्थित पदाधिकारी:
या आंदोलनात जिल्हाप्रमुख सौ. शुभांगीताई ठमेकर, उपजिल्हाप्रमुख अमित गावंडे, युवासेना उपतालुकाप्रमुख अमोल देशपांडे यांच्यासह मंदाकिनीताई ढाले, पल्लवीताई सराटे, हेमलताताई मेश्राम, ललीताताई कैकाडे, अश्विनीताई गेडाम, निकीताताई काळे, अनुष्काताई जांभुळकर, सुनिताताई भितघरे, प्रियंकाताई कैकाडे, सोनालीताई बालपांडे, पुनम काटकर, रोशनी वाघमारे, वैशालीताई ढाले, विभाताई कापटे व असंख्य शिवसैनिक आणि महिला आघाडीच्या सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या