Type Here to Get Search Results !

Vanchit Varta 24 news

Vanchit Varta 24 news

वर्धा शहरालगतच्या १५ ग्रामपंचायतींना 'स्वच्छतेची' ताकद; पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते ई-घंटागाड्यांचे वितरण

 



वर्धा (प्रतिनिधी व कार्यकारी संपादक): आशिष अंबादे

वाढत्या नागरीकरणामुळे वर्धा शहरालगतच्या ग्रामपंचायतींच्या लोकसंख्येत मोठी वाढ झाली आहे. या वाढत्या लोकसंख्येसोबतच कचरा व्यवस्थापनाचा प्रश्नही गंभीर झाला होता. ही समस्या लक्षात घेता, पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा परिषदेच्या जनसुविधा निधीअंतर्गत १५ ई-घंटागाड्यांची खरेदी करण्यात आली. या वाहनांचे अधिकृत वितरण आज जिल्हा परिषद परिसरात पालकमंत्र्यांच्या हस्ते पार पडले.

​याप्रसंगी जिल्हाधिकारी वान्मथी सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल भोसले यांच्यासह संबंधित ग्रामपंचायतींचे सरपंच, माजी सरपंच व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

​स्वच्छतेचा प्रश्न होणार मार्गी

​गेल्या काही वर्षांत पिपरी, सावंगी, नालवाडी यांसारख्या शहरालगतच्या गावांचा विस्तार मोठ्या प्रमाणावर झाला आहे. कचरा संकलनासाठी पुरेशी वाहने नसल्याने दैनंदिन स्वच्छतेत अडथळे येत होते. "ग्रामपंचायतींची स्वच्छता राखणे आणि कचरा डेपोपर्यंत कचरा पोहोचवणे आता या नवीन वाहनांमुळे सुलभ होईल," असा विश्वास पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी यावेळी व्यक्त केला.



​या १५ ग्रामपंचायतींना मिळाला लाभ

​कार्यक्रमात खालील ग्रामपंचायतींना ई-घंटागाड्यांचे वाटप करण्यात आले:

  • ​पिपरी मेघे, उमरी मेघे, नालवाडी, बोरगाव मेघे.
  • ​सालोड हिरापूर, सावंगी मेघे, म्हसाळा, पवनार.
  • ​साटोडा, सिंदी मेघे, वरुड, घोराड.
  • ​केळझर, येळाकेळी आणि नटाळा पुनर्वसन.

​जिल्हा परिषदेच्या या पुढाकारामुळे उपनगरांच्या स्वच्छतेला आता नवी गती मिळणार असून, नागरिकांनीही कचरा व्यवस्थापनात सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या