Type Here to Get Search Results !

Vanchit Varta 24 news

Vanchit Varta 24 news

नरेंद्र गंधारे यांची विश्व हिंदू परिषद हिंगणघाट नगर प्रखंड सहमंत्री पदी नियुक्ती

 



हिंगणघाट (प्रतिनिधी): नरेंद्र (विवेक) चिंतलवार

विश्व हिंदू परिषद हिंगणघाट नगर शाखेच्या विस्तारासाठी आणि संघटन बळकटीकरणासाठी नुकतीच एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत नरेंद्र गंधारे यांची विश्व हिंदू परिषद हिंगणघाट नगर प्रखंड सहमंत्री पदी सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली आहे.

​याप्रसंगी वर्धा जिल्हा विहिप मंत्री शरद कोणप्रतिवार, जिल्हा विशेष संपर्क प्रमुख गजानन मसाये, हिंगणघाट ग्रामीण प्रखंड मंत्री देवा वाघमारे, ग्रामीण प्रखंड सहमंत्री अतुल सूर, जिल्हा बजरंग दल सह गौरक्षा प्रमुख राम नक्के, विहिप सह मंदिर अर्चक पुरोहित प्रमुख सुरज वरठी आणि अनुलोमचे विशाल मुटे प्रामुख्याने उपस्थित होते.

संघटन वाढीसाठी होणार मदत

नरेंद्र गंधारे यांच्या नियुक्तीमुळे हिंगणघाट शहरात विश्व हिंदू परिषदेचे कार्य अधिक गतिमान होईल आणि संघटनात्मक बांधणीला मोठी मदत मिळेल, असा विश्वास उपस्थित पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला. त्यांच्या निवडीबद्दल विदर्भ प्रांतातून आणि जिल्हा स्तरावरून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

दिग्गजांनी केले अभिनंदन

गंधारे यांच्या निवडीबद्दल विदर्भ प्रांत स्वावलंबी भारत प्रमुख अटल पांडे, जिल्हाध्यक्ष सुभाष राठी, उपाध्यक्ष देवानंद धुर्वे, वंदना चाफले, राखी वैरागडे, जिल्हा सहमंत्री अरविंद कोकाटे, संजय पोफळी, बजरंग दल संयोजक महेश राऊत, हिंगणघाट प्रखंड अध्यक्ष सुरेंद्र आगरे, नगर प्रखंड अध्यक्ष पंकज देशपांडे, नगर प्रखंड मंत्री राम पोतदार आणि सहमंत्री रोशन चंदनखेडे यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या