Type Here to Get Search Results !

Vanchit Varta 24 news

Vanchit Varta 24 news

हिंगणघाट पोलिसांची मोठी कारवाई: १० लाख ७२ हजारांच्या मुद्देमालासह विदेशी दारू जप्त

 



हिंगणघाट: सचिन हाडके 

उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पथकाने नागरी रोडवरील मानोरा फाटा येथे सापळा रचून अवैध विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या हुंडई क्रेटा कारवर छापा टाकला. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, एकूण १० लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?

​दिनांक ०८/०४/२६ रोजी हिंगणघाट उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली होती की, चंद्रपूर जिल्ह्यातून नागरी मार्गे एका पांढऱ्या रंगाच्या हुंडई क्रेटा कारमधून (क्रमांक MH 40 BC 0019) मोठ्या प्रमाणात अवैध विदेशी दारू हिंगणघाट शहराकडे आणली जात आहे.

​माहिती मिळताच, पथकाने हिंगणघाट ते नागरी रोडवरील मौजा मानोरा फाटा येथे पंचांसह नाकेबंदी केली. संशयास्पद क्रेटा कार येताच तिला थांबवून झडती घेतली असता, कारच्या मागच्या सीटखाली आणि डिक्कीमध्ये दहा खोक्यांत बडवायजर मॅग्नम कंपनीचे ५०० मिलीचे २४० सीलबंद बियरचे डबे आढळून आले.

अटक केलेले आरोपी:

​१. मोहम्मद अशरफ उर्फ गुड्डू मोहम्मद कलीम खोकर (चालक, रा. शिवाजी वॉर्ड, हिंगणघाट)

२. अनुराग राजेश नंदागवळी (रा. महात्मा फुले वॉर्ड, हिंगणघाट)

जप्त केलेला मुद्देमाल:

  • ​पांढऱ्या रंगाची हुंडई क्रेटा कार (किंमत १०,००,०००/- रुपये)
  • ​बडवायजर मॅग्नम बियरचे २४० टीन (किंमत ७२,०००/- रुपये)
  • एकूण किंमत: १०,७२,०००/- रुपये

यांच्या मार्गदर्शनात झाली कारवाई:

​सदर धडक कारवाई वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सौरभ अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुशील कुमार नायक यांच्या निर्देशानुसार करण्यात आली.

​या मोहिमेत पोलीस हवालदार अश्विन सुखदेवे, चेतन पिसे, रवींद्र घाटुर्ले, उमेश लडके, राहुल साठे आणि सतीश घवघवे यांनी सहभाग नोंदवला. आरोपींविरुद्ध हिंगणघाट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या