Type Here to Get Search Results !

Vanchit Varta 24 news

Vanchit Varta 24 news

भैयरे येथील सौ. आशाबाई विलास डोळस यांचे निधन; गुरुवारी जलदान विधी व पुण्यामोदन सोहळा

 



मावळ (प्रतिनिधी): अमोल जाधव

भैयरे (ता. मावळ) येथील रहिवासी कालकथित सौ. आशाबाई विलास डोळस (वय ५९ वर्ष) यांचे शुक्रवार, दिनांक १० जुलै २०२६ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, मुलगी, जावई आणि मोठा आप्तपरिवार आहे.

​सौ. आशाबाई डोळस यांच्या निधनाने डोळस परिवारासह संपूर्ण भैयरे गावावर शोककळा पसरली आहे.

​त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो यासाठी जलदान विधी व पुण्यामोदन सोहळा गुरुवार, दिनांक १६ जुलै २०२६ रोजी सकाळी ९:३० ते ११:३० या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमाची रूपरेषा:

  • उपासक: आयु. रवी भवार (अध्यक्ष: भा.बौ.म. मावळ) आणि आयु. राहुल सगाजी पवार (श्राम. व बौद्धाचार्य).
  • बौद्धाचार्य / प्रवचन: समाजभूषण आयु. सुधाकर अभंग (प्रबोधनकार) यांचे मार्गदर्शक प्रवचन लाभणार आहे.
  • कार्यक्रम स्थळ: मु. पो. भैयरे, ता. मावळ, जि. पुणे.

​या दुःखद प्रसंगी विलास मारुती डोळस (पती), सुभाष विलास डोळस (मुलगा), सचिन विलास डोळस (मुलगा), निशा विनायक चव्हाण (मुलगी) यांच्यासह समस्त डोळस, पवार, गायकवाड, चव्हाण, ओव्हाळ, वंजारी, सोनवणे, ससाणे परिवार आणि समस्त ग्रामस्थ भैयरे शोकाकुल आहेत. कार्यक्रमाचे व्यवस्थापन नवज्योत तरुण मित्र मंडळ (भैयरे) यांच्या वतीने करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या