Type Here to Get Search Results !

Vanchit Varta 24 news

Vanchit Varta 24 news

आजाद समाज पार्टीचे छत्रपती संभाजीनगरमध्ये भव्य भागीदारी आंदोलन; सामाजिक न्याय आणि समान प्रतिनिधित्वाची मागणी

 



​छत्रपती संभाजीनगर (विशेष बातमीदार): अर्पित वाहने 

वंचित घटकांना सामाजिक न्याय, समान हक्क आणि लोकसंख्येच्या प्रमाणात योग्य प्रतिनिधित्व मिळावे, या प्रमुख मागण्यांसाठी आजाद समाज पार्टी (कांशीराम) च्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य 'भागीदारी आंदोलन' करण्यात आले.

​हे आंदोलन जिल्हाध्यक्ष विजय शिनगारे आणि मराठवाडा अध्यक्ष शिवाजी वीर यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. या आंदोलनात SC, ST, OBC, महिला व इतर वंचित घटकांतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांच्या वतीने महसूल उपजिल्हाधिकारी एकनाथ बांगळे यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

​निवेदनातील प्रमुख मागण्या:

  1. ​OBC ची स्वतंत्र जातनिहाय जनगणना तात्काळ करण्यात यावी.

  1. ​SC, ST, OBC प्रवर्गाला शिक्षण व सरकारी सेवांमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात प्रभावी प्रतिनिधित्व दिले जावे.

  1. ​सरकारी नोकऱ्यांमध्ये पदोन्नतीतील आरक्षणाचा लाभ पूर्ववत सुरू ठेवावा.

  1. ​शासकीय खरेदी आणि सरकारी कंत्राटांमध्ये वंचित घटकांसाठी विशेष आरक्षण लागू करावे.

  1. ​उच्च शिक्षण संस्थांमधील जातीय भेदभावाला आळा घालण्यासाठी कठोर कायदेशीर उपाययोजना कराव्यात.

  1. ​शासकीय विभागातील अनुशेषाची (रिक्त) पदे तात्काळ भरण्यात यावीत.

​या आंदोलनाला तात्याराव ससाणे, राहुल साबळे, विजय भिवसने, समाधान सुरडकर, आझर भाई शेख, रेखाताई राजभोज, सारिका जाधव, राधाताई यादव, सागर अंभोरे, अमोल सोनवणे, शकील भाई पठाण, शोभाबाई साठे आणि सिद्धार्थ तुपे यांच्यासह आजाद समाज पार्टीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​वार्ताहर: अर्पित वाहाणे (मो. 8956647004) 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या