हिंगणघाट (विशेष प्रतिनिधी): सचिन हाडके
पितृपक्षाच्या पावन पर्वाचे औचित्य साधून नारायण सेवा मित्र परिवार, हिंगणघाट यांच्या वतीने रविवारी स्थानिक जलाराम मंदिर परिसरात गरजू नागरिकांसाठी भव्य 'नारायण भोज'चे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाच्या माध्यमातून मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या गरजू नागरिकांना व त्यांच्या कुटुंबीयांना प्रेमपूर्वक भोजन देऊन सामाजिक बांधिलकीचा अनोखा संदेश देण्यात आला.
पितृपक्षात पूर्वजांचे स्मरण करत असतानाच समाजातील वंचित व गरजू घटकांची सेवा करण्याची भारतीय संस्कृतीची परंपरा जपण्याच्या उद्देशाने या अन्नदान उपक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. भोजनासाठी आलेल्या प्रत्येक नागरिकाचे अत्यंत आपुलकीने स्वागत करून त्यांना अन्नदान करण्यात आले. या उपक्रमातून माणुसकी, सामाजिक संवेदना आणि परस्पर सहकार्याची भावना अधिक दृढ करण्याचा स्तुत्य प्रयत्न परिवाराच्या सदस्यांनी केला.
सदस्यांचा उल्लेखनीय सहभाग
या सेवाकार्याचा यशस्वीतेसाठी नारायण सेवा मित्र परिवाराचे महेश दीक्षित, लक्ष्मण डहाके, विपिन खिवसरा, पराग मुडे, ॲड. विशाल जैन, दामोदर चंदनखेडे, रूपचंद हेमनानी, मनोज सिंघवी, ताराचंद सिंघवी, चंद्रकांत रोहनकर, दुर्गाप्रसाद यादव, विजय गुप्ता, दिनेश धारकर, महेंद्र मुनोत, राधेश्याम श्रीवास, सुंदरभाई बसंतानी, संतोष बोधानी, रवि दुशेट्टीवार, चंद्रकांत कामडी, सुनील अलोनी, अमोल भुतडा, सूर्यकांत ठाकरे, विलास जाधव, यशवंत गढवार, मनोज मैद, ज्ञानेश्वर, लतिका बेलेकर, भाग्यश्री खियानी, अनुराधा मोटवानी, वीरश्री मुडे, अलका रानपारा व किरण अग्रवाल यांच्यासह सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
भविष्यातही सेवा उपक्रम सुरू ठेवण्याचा निर्धार
नारायण सेवा मित्र परिवाराच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रम राबविले जातात. "नरसेवा हीच नारायण सेवा" या भावनेतून गरजूंच्या मदतीसाठी सदैव कार्यरत राहणे हेच परिवाराचे मुख्य ध्येय असल्याचे सदस्यांनी सांगितले. तसेच समाजातील अंतिम घटकापर्यंत मदतीचा हात पोहोचवण्यासाठी भविष्यातही अशाच प्रकारचे सेवाभावी उपक्रम सातत्याने राबविण्याचा निर्धार यावेळी परिवाराच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या