Type Here to Get Search Results !

Vanchit Varta 24 news

Vanchit Varta 24 news

साहित्य क्षेत्रात एक सुरेख कामगिरी: मराठी-हिंदी भाषेवर प्रभुत्व असणाऱ्या शलोमित खान यांच्या दर्जेदार लिखानाची सर्वत्र चर्चा!

 


साहित्य क्षेत्रात एक सुरेख कामगिरी: मराठी-हिंदी भाषेवर प्रभुत्व असणाऱ्या शलोमित खान यांच्या दर्जेदार लिखानाची सर्वत्र चर्चा!

​- वर्धा प्रतिनिधी : अर्पित वाहने 

​शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील सुप्रसिद्ध साहित्यिक शलोमित खान यांचे नाव आज साहित्य वर्तुळात आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून घराघरा पोहोचले आहे. मराठी आणि हिंदी भाषेवर उत्तम प्रभुत्व असलेल्या शलोमित खान यांनी आपल्या सहजसुंदर आणि नियमित लिखाणातून साहित्य क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

​महाविद्यालयातून शैक्षणिक कारकीर्द:

शलोमित खान यांनी शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले असून, त्याच महाविद्यालयात त्या हिंदी विभागप्रमुख म्हणूनही कार्यरत राहिल्या आहेत. अध्यापनासोबतच त्यांच्यातील साहित्यिका नेहमीच सक्रिय राहिली आहे.

​'सहज सुचलं' ग्रुपवर लोकप्रियतेच्या शिखरावर:

सध्या 'सहज सुचलं' या महिलांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर त्यांचे विविध विषयांवर व्यापक आणि नियमित लिखाण सुरू आहे. या ग्रुपवर प्रवेश केल्यापासूनच त्यांनी आपल्या प्रभावी लेखनाला सुरुवात केली आणि बघता बघता अल्पावधीतच त्यांच्या दर्जेदार लिखाणाने साऱ्यांनाच वेड लावले. मराठी व हिंदी भाषेसोबतच त्यांचे इंग्रजी भाषेवरही उत्तम प्रभुत्व असून, त्यांनी सर्वाधिक लिखाण हिंदी भाषेतून केले आहे. त्यांच्या या निरंतर आणि प्रभावी लेखनामुळे त्या आज लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचल्या आहेत.

​सेवानिवृत्तीच्या काळातही लेखनाची अखंड साधना:

सध्या सेवानिवृत्तीच्या काळातही त्या विश्रांती न घेता आपल्या नित्य लेखनात मग्न आहेत. विशेषतः आगामी दीपावली अंकासाठी त्यांचे दर्जेदार लिखाण सध्या वेगाने सुरू असून, त्यांच्या या साहित्यिक प्रवासाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या