Type Here to Get Search Results !

Vanchit Varta 24 news

Vanchit Varta 24 news

वर्षानुवर्षे प्रतीक्षेनंतर बाजारवाडा येथील पांदन रस्ता झाला अतिक्रमणमुक्त!

 



​आमदार सुमितभाऊ वानखेडे यांच्या पुढाकाराने व महसूल विभागाच्या कारवाईमुळे शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा

​बाजारवाडा (प्रतिनिधी): अर्पित वाहने 

आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. श्री. सुमितभाऊ वानखेडे यांच्या विशेष पुढाकाराने आणि महसूल विभागाच्या ठोस कारवाईमुळे मौजा बाजारवाडा येथील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला पांदन रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. नाशीर मुल्ला व अग्रवाल यांच्या शेतापासून खांडेकर यांच्या शेतापर्यंत जाणारा हा पांदन रस्ता अनेक वर्षांपासून अतिक्रमणामुळे वादग्रस्त व बंद झाला होता, ज्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. १२ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रशासकीय यंत्रणेच्या उपस्थितीत हा रस्ता अतिक्रमणमुक्त करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

​काय होता नेमका प्रश्न?

​बाजारवाडा येथील ग्रामपंचायतीने २०१८ मध्ये या पांदन रस्ता बांधकामाचा मंजुरी प्रस्ताव पंचायत समिती आर्वी यांच्याकडे पाठवला होता, त्यानुसार हा रस्ता २०२० मध्ये मंजूर झाला. मात्र, 'मरेगा' (MGNREGS) या योजनेअंतर्गत मंजूर असलेल्या या रस्त्यावर अतिक्रमण असल्यामुळे २०१० पासूनच प्रत्यक्ष काम करणे अशक्य झाले होते. शेतकऱ्यांसाठी शेतात जाण्या-येण्याचा मार्ग हा दैनंदिन शेतीकामाचा कणा असतो; परंतु पांदणरस्ता बंद असल्यामुळे शेतीमालाची वाहतूक आणि अवजारे नेण्यात शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.

​आमदार सुमितभाऊ वानखेडे यांच्याकडे धाव

​ग्रामपंचायत बाजारवाडा येथे आयोजित 'आमदार आपल्या दारी' या कार्यक्रमादरम्यान नागरिकांच्या तक्रारी व अडचणी ऐकून घेताना, या पांदन रस्त्यावरील वहिवाटदार शेतकऱ्यांनी आमदार मा. श्री. सुमितभाऊ वानखेडे यांच्याकडे आपले निवेदन सादर केले. शेतकऱ्यांच्या या ज्वलंत व अत्यंत महत्त्वाच्या समस्येची तत्काळ दखल घेत आमदारांनी तहसीलदार आर्वी यांना पांदन रस्त्यावरील अतिक्रमण कायदेशीररित्या हटवण्याबाबत कडक सूचना दिल्या होत्या.

​महसूल व प्रशासकीय यंत्रणेची संयुक्त कारवाई

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या