विशेष प्रतिनिधी / अर्पित वाहाणे
(मो. ८९५६६४७००४)
औरंगाबाद (दि. ०६ ऑक्टोबर २०२६):
स्थानिक शासकीय विश्रामगृह, औरंगाबाद येथे आयोजित विशेष नियुक्ती कार्यक्रमात आझाद समाज पार्टी (कांशीराम) च्या अल्पसंख्यांक शहर उपाध्यक्षपदी शेख मुस्ताक शेख हकीम यांची निवड करण्यात आली आहे.
ही नियुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय देवराव शिनगारे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली. याप्रसंगी पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचवून संघटन अधिक मजबूत करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमास पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने:
- राहुल साबळे (जिल्हा प्रभारी)
- अझर भाई शेख (अल्पसंख्यांक शहराध्यक्ष)
- मुनीर भाई शेख (दिव्यांग आघाडी जिल्हाध्यक्ष)
- सागर अंभोरे (जिल्हा सचिव)
- इजाज शेख (वार्डाध्यक्ष)
- कलीम भाई (अल्पसंख्यांक शहर उपाध्यक्ष)
- साहेब का पठाण, चिंतामण शिंदे व इतर मान्यवर उपस्थित होते.
नवनियुक्त अल्पसंख्यांक शहर उपाध्यक्ष शेख मुस्ताक शेख हकीम यांचे उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले व पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या