वर्धा जिल्हाध्यक्ष शरद शहारे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वितरण; कार्याध्यक्ष आशिष ठाकरे यांची उपस्थिती
अर्पित वाहाणे | विशेष प्रतिनिधी
मो. 8956647004
आर्वी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) यांच्या वतीने आर्वी विधानसभा क्षेत्रात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी संघटनात्मक नियुक्त्यांना वेग देण्यात आला आहे. आर्वी, आष्टी आणि कारंजा तालुक्यांसह शहर पातळीवर विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. वर्धा येथे मंगळवारी, दिनांक १३ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता आयोजित पक्ष संघटना आढावा व विस्तार बैठकीत या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. वर्धा जिल्हाध्यक्ष शरद भाऊ शहारे यांच्या हस्ते आणि जिल्हा कार्याध्यक्ष आशिष ठाकरे यांच्या उपस्थितीत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.
दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांचे पुरोगामी विचार गावागावांत पोहोचविण्यासह सर्वसमावेशक संघटना उभारण्यावर या बैठकीत भर देण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मान्यतेने या नियुक्त्या करण्यात आल्या.
आर्वी, आष्टी आणि कारंजा येथे नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती
आर्वी विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे यांनी सुचविलेल्या नावांनुसार विविध पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या. यामध्ये आर्वी तालुका अध्यक्षपदी कमलेश चिंधेकर, तालुका कार्याध्यक्षपदी प्रफुल सोमकुवर, आर्वी शहराध्यक्षपदी नितीन मिश्रा आणि शहर कार्याध्यक्षपदी अनिल बेंद्रे यांची नियुक्ती करण्यात आली.
तसेच आष्टी तालुकाध्यक्षपदी किशोर मानमोडे आणि आष्टी शहराध्यक्षपदी मंगेश निमकरडे यांची निवड करण्यात आली. कारंजा तालुकाध्यक्षपदी मारोतराव आस्कर, तालुका कार्याध्यक्षपदी गणपत चौधरी आणि कारंजा शहराध्यक्षपदी अझरुद्दीन शेख तथा मोहम्मद कलीम यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.
सर्वसमावेशक संघटना उभारण्याचा दिलीप पोटफोडे यांचा निर्धार
आर्वी विधानसभा क्षेत्रातील गावागावांत सर्वसामान्य नागरिकांशी जोडलेले, प्रामाणिकपणे काम करणारे आणि अठरापगड जातीतील कार्यकर्ते यांना पक्ष संघटनेत संधी देण्यात येणार असल्याचे आर्वी विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे यांनी सांगितले.
आर्वी विधानसभा क्षेत्रातील सर्व ३१० बुथवर संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याचे उद्दिष्ट असून, कार्यकर्त्यांना सोबत घेऊन अजितदादा पवार यांच्या विचारांची मजबूत फळी उभी करण्यात येईल. आगामी काळात संघटना विस्तारासाठी नियोजनबद्ध रणनीती आखून काम करण्याचा निर्धार नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
मान्यवरांची उपस्थिती; नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन
या बैठकीला सहकार सेलचे विदर्भ कार्याध्यक्ष प्रफुल गुल्हाने, प्रदेश सचिव विभाताई दाते, ज्येष्ठ नागरिक सेलच्या जिल्हाध्यक्षा पाठक ताई, युवक जिल्हाध्यक्ष मयूर डफळे (पाटील), व्यापारी सेलचे जिल्हाध्यक्ष देवीलाल जैस्वाल, जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप गिरडकर, जिल्हा सचिव गजानन लाखे, हिंगणघाट विधानसभा अध्यक्ष दिनेश गुजरकर, वर्धा विधानसभा अध्यक्ष विनय डाहाके, पुलगाव-देवळी विधानसभा अध्यक्ष तुषार वाघ, वर्धा शहराध्यक्ष गजानन खोंड, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष डॉ. कपिल मून आणि अमोल येसनकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील राजकीय व संघटनात्मक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या नियुक्त्यांमुळे आर्वी विधानसभा क्षेत्रात पक्ष संघटनेला नवी दिशा आणि गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या