Type Here to Get Search Results !

Vanchit Varta 24 news

Vanchit Varta 24 news

हिंगणघाट पोलिसांची मोठी कारवाई: १२ लाखांचा अवैध दारूसाठा जप्त

 

हिंगणघाट पोलिसांची मोठी कारवाई: १२ लाखांचा अवैध दारूसाठा जप्त

महात्मा फुले वॉर्डातील घरावर छापा; आरोपीच्या घरातून देशी-विदेशी दारूच्या पेट्या जप्त



हिंगणघाट (प्रतिनिधी): सचिन हाडके 

हिंगणघाट पोलिसांनी अवैध दारू विक्री आणि साठवणुकीविरुद्ध मोठी मोहीम उघडली असून, शहरातील महात्मा फुले वॉर्डातील एका घरावर धाड टाकून तब्बल १२ लाख ६ हजार ६०० रुपये किमतीचा अवैध दारूसाठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध दारू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

​दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास हिंगणघाट पोलीस स्टेशनचे सपोनि पद्ममाकर मुंडे, सपोनि दीपक वानखडे व गुन्हे प्रकटीकरण पथक (DB) परिसरात गस्त घालत होते. यावेळी गोपनीय माहिती मिळाली की, महात्मा फुले वॉर्डातील रहिवासी पंकज काळे याने त्याच्या घरात देशी व विदेशी दारूचा मोठा साठा लपवून ठेवला आहे.

​मिळालेल्या माहितीची शहानिशा करून पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी पंचांसमक्ष घराची झडती घेतली. यावेळी घरात विविध कंपन्यांच्या देशी आणि विदेशी दारूचे एकूण ९२ खर्ड्याचे खोके आढळून आले.

जप्त करण्यात आलेला माल:

​पोलिसांनी केलेल्या कारवाईत खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला:

  • देशी दारू: विके, टँगो पंच, कोकण आणि भिंगरी अशा विविध कंपन्यांच्या एकूण ७,५०० सीलबंद शिश्या (किंमत ९ लाख रुपये).
  • विदेशी दारू: रॉयल स्टॅगचे २ लिटरचे ३० बंपर आणि १८० मिलीच्या ४३२ शिश्या, तसेच ओल्डमन कंपनीच्या शिश्या (किंमत ३ लाख ६ हजार ६०० रुपये).
  • एकूण किंमत: १२,०६,६०० रुपये.

​ही धडक कारवाई वर्ध्याचे पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल राऊत, सपोनि पद्ममाकर मुंडे, सपोनि दीपक वानखडे आणि डी.बी. पथकाचे हवालदार प्रशांत ठोंबरे, किशोर कडू, जगदीश चव्हाण, सुनील मेंढे, राजेश शेंडे, आशिष नेवारे, मंगेश वाघमारे आणि रोहित साठे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

​याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या