Type Here to Get Search Results !

Vanchit Varta 24 news

Vanchit Varta 24 news

सेवाग्राम पोलिसांकडून ५ लाखांच्या अवैध दारूसाठ्यावर फिरविला बुलडोझर; ३४ गुन्ह्यांतील मुद्देमालाचा नाश

 



वर्धा (जिल्हा प्रतिनिधी): सचिन हाडके

वर्धा येथील विद्यमान न्यायालयाचा निकाल आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग, वर्धा यांच्या आदेशानुसार आज, ३० जानेवारी २०२६ रोजी सेवाग्राम पोलीस स्टेशन अंतर्गत जप्त करण्यात आलेल्या सुमारे ५,००,९५० रुपयांच्या अवैध देशी-विदेशी दारूसाठ्याचा नाश करण्यात आला.

३४ गुन्ह्यांतील मुद्देमाल नष्ट

सेवाग्राम पोलिसांनी गेल्या काही काळातील ३४ विविध कारवायांमध्ये जप्त केलेला मोठा साठा आज नष्ट केला. यामध्ये प्रामुख्याने खालील साठ्याचा समावेश होता:

  • विदेशी दारू: १८० मि.ली.च्या १७२८ शिष्या, ३७५ मि.ली.च्या १३ शिष्या आणि ७५० मि.ली.च्या १२ शिष्या.
  • बिअर: ५०० मि.ली.च्या १०३ बॉटल्स आणि ६५० मि.ली.च्या २४ बॉटल्स.
  • देशी दारू: १८० मि.ली.च्या १४ शिष्या आणि ९० मि.ली.च्या ४४७ शिष्या.

अधिकारी आणि पंचांच्या उपस्थितीत कारवाई

सदर कारवाई सेवाग्रामचे पोलीस निरीक्षक नागेश कुमार चतरकर, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस उपनिरीक्षक डी. वाय. राऊत यांच्या मार्गदर्शनात पार पडली. यावेळी पथकातील हरिदास सुरजुसे (सहाय्यक फौजदार), अखिलेश यशपाला, पोलीस हवालदार हरिदास काकड, विलास लोहकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

​या कायदेशीर प्रक्रियेसाठी पंच म्हणून मेहमुदीन वाहबुदीन काजी (रा. पवणार), अरविंद मोतीराम लाडे (रा. पवणार) आणि गणेश हिवरे यांनी साक्ष दिली. न्यायालयाच्या निर्णयानुसार रीतसर पंचनामा करून सर्व मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या