Type Here to Get Search Results !

Vanchit Varta 24 news

Vanchit Varta 24 news

प्रहारचे माजी आमदार बच्चूभाऊ कडूंचा साधेपणा: हिंगणघाटमध्ये नवनिर्वाचित नगरसेवकाच्या घरी दिली 'सरप्राईज व्हिजिट'

 



हिंगणघाट (प्रतिनिधी): सचिन हाडके 

राजकारणात सत्तेच्या शिखरावर पोहोचल्यावर अनेक नेते जमिनीशी असलेले नाते विसरतात, मात्र प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा माजी आमदार बच्चूभाऊ कडू यांनी पुन्हा एकदा आपला 'डाऊन टू अर्थ' स्वभाव सिद्ध केला आहे. हिंगणघाट येथील प्रहारचे नवनिर्वाचित नगरसेवक सुरज दादाजी कुबडे यांच्या निवासस्थानी कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक भेट देऊन बच्चूभाऊंनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

कार्यकर्ता हा आकडा नव्हे, तर माणूस आहे!

​नेहमीच सामान्यांच्या प्रश्नावर आक्रमक असणारे बच्चूभाऊ कडू  हिंगणघाट दौऱ्यावर असताना, त्यांनी थेट नगरसेवक सुरज कुबडे यांचे घर गाठले. यावेळी त्यांनी कुबडे यांच्या आई-वडिलांशी आणि कुटुंबीयांशी अत्यंत आपुलकीने संवाद साधला. "कार्यकर्ता हा केवळ निवडणुकीपुरता वापरण्याचा आकडा नसून, तो आपल्या कुटुंबाचा भाग आहे," ही प्रहारची संस्कृती त्यांनी आपल्या कृतीतून पुन्हा एकदा अधोरेखित केली.



नगरसेवक सुरज कुबडे भावूक

​या भेटीबद्दल बोलताना सुरज कुबडे भावूक झाले. ते म्हणाले, "आजचा दिवस माझ्या राजकीय प्रवासातील सर्वात प्रेरणादायी क्षण आहे. साहेब स्वतः माझ्या घरी येतील, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. सत्तेच्या शिखरावर असूनही ज्यांच्या पायाला आजही मातीचा गंध आहे, अशा नेतृत्वाच्या मार्गदर्शनात काम करणे हे माझे भाग्य आहे. ही भेट केवळ सदिच्छा भेट नसून, सामान्यांच्या न्याय्य हक्कासाठी लढण्याची मला मिळालेली नवी ऊर्जा आहे."

जबाबदारीची जाणीव

​सुरज कुबडे यांनी पुढे नमूद केले की, नगरसेवक हे पद आज साहेबांच्या भेटीमुळे लहान वाटू लागले असून, 'माणूस' म्हणून जपले जाणे किती मोठे आहे, याची जाणीव झाली. अन्यायाविरुद्ध निर्भीडपणे उभे राहण्याची आणि शेवटच्या माणसापर्यंत न्याय पोहोचवण्याची शपथ त्यांनी यावेळी पुनरुच्चारित केली.

​या भेटीमुळे हिंगणघाटमधील प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, बच्चूभाऊंच्या या साधेपणाची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात रंगत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या