नगरसेवक विक्रांत भगत यांच्या पुढाकाराने गरजूंना घरकुल मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न
वर्धा (प्रतिनिधी): सचिन हाडके
भीमनगर वॉर्डातील गरीब व गरजू नागरिकांना हक्काचे घर मिळावे, या उद्देशाने संघर्ष क्लब द्वारे येथे एका विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा, यासाठी नगरसेवक विक्रांत भगत यांच्या पुढाकाराने ही सभा घेण्यात आली.
या सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून नगरपालिकेच्या अध्यक्ष माननीय नयनाताई उमेशजी तुडसकर उपस्थित होत्या. त्यांनी उपस्थितांना घरकुल योजनेचे नियम, अर्जाची प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी प्रधानमंत्री घरकुल योजनेचे अधिकारी प्रमोद बोरकर आणि पप्पू ब्रामणे यांनी तांत्रिक बाबींची माहिती देऊन नागरिकांच्या शंकांचे निरसन केले.
याप्रसंगी नगरसेवक विक्रांत भगत यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांचे आभार मानले. ते म्हणाले की, "वॉर्डातील एकही कुटुंब घरापासून वंचित राहू नये, हाच आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे." या सभेला ५० हून अधिक नागरिकांनी उपस्थित राहून माहिती घेतली, तर २५ कुटुंबांनी प्रत्यक्ष प्रक्रियेत सहभाग दर्शवला.
यांची होती उपस्थिती:
या सभेला राजू कुंभारे, सुहास जीवनकर, कुंदन कुटे, मंगेश लोहकरे, वसंता नाईक, सुबोध मांडवे, संघर्ष क्लबचे पदाधिकारी, अध्यक्ष संजयभाऊ धाबर्डे, कार्याध्यक्ष रवीभाऊ मांडवे, उपाध्यक्ष प्रवीणभाऊ वाणे, नितीनभाऊ सुटे यांनी आभार व्यक्त केले. उल्हास नगराडे, राजू लडे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
या संपूर्ण उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी विक्रांत भगत, राजू कुंभारे आणि सुहास जीवनकर यांच्यासह संघर्ष क्लबच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या