Type Here to Get Search Results !

Vanchit Varta 24 news

Vanchit Varta 24 news

पिंपळगाव येथे १९ लक्ष रुपयांच्या पांदन रस्त्याचे आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या हस्ते भूमिपूजन

 



शेतकऱ्यांची चिखलातून होणार सुटका; आमदारांच्या पुढाकाराने निधी उपलब्ध

हिंगणघाट/समुद्रपूर (प्रतिनिधी): सचिन हाडके 

तालुक्यातील पिंपळगाव येथील शेतकऱ्यांची गेल्या अनेक वर्षांची रस्त्याची प्रतीक्षा अखेर संपली आहे. पावसाळ्यात शेतात जाण्या-येण्यासाठी शेतकऱ्यांना होणारा त्रास लक्षात घेता, आमदार समीरभाऊ कुणावार यांनी उपलब्ध करून दिलेल्या १९ लक्ष रुपये निधीतून पांदन रस्त्याच्या कामाचे भव्य भूमिपूजन २५ डिसेंबर रोजी संपन्न झाले.

​पिंपळगाव शिवारातील शेतकऱ्यांना पावसाळ्याच्या दिवसात शेतात जाताना चिखलामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या समस्येबाबत शेतकऱ्यांनी आमदार समीरभाऊ कुणावार यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली होती. शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत आमदारांनी तातडीने या पांदन रस्त्यासाठी १९ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून दिला.

दिग्गजांची उपस्थिती

या विकासकामाच्या भूमिपूजन सोहळ्याला आमदार समीरभाऊ कुणावार यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती वामनराव चंदनखेडे, माजी सरपंच किसनाजी शेंडे, विजय कोरेकार, विनोद कन्हाळकर, घनश्याम कराळे व इतर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी मानले आभार

या पांदन रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर शेतकऱ्यांची मोठी अडचण दूर होणार असून, पीक वाहतुकीसाठीही सोय होणार आहे. विकासकामाचा शब्द पाळल्याबद्दल परिसरातील शेतकऱ्यांनी आमदार कुणावार यांचे मनापासून आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाला पिंपळगाव येथील नागरिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या