Type Here to Get Search Results !

Vanchit Varta 24 news

Vanchit Varta 24 news

वर्धा व पुलगाव येथे महारोजगार मेळाव्याचे आयोजन; सुशिक्षित बेरोजगारांना सुवर्णसंधी

 



प्रशासनाकडून उपस्थित राहण्याचे आवाहन: २७ व ३० मार्च रोजी होणार 'प्लेसमेंट ड्राईव्ह'

वर्धा (प्रतिनिधी):आशिष अंबादे

वर्धा जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींसाठी रोजगाराची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या (ITI) संयुक्त विद्यमाने वर्धा आणि पुलगाव येथे 'पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा व प्लेसमेंट ड्राईव्ह' आयोजित करण्यात आला आहे.

​जिल्ह्यातील १२ वी उत्तीर्ण, आयटीआय (ITI), पदवीधर, डिप्लोमाधारक तसेच 'स्टेप' (STEP) अंतर्गत अल्पमुदत प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांना या मेळाव्यात रोजगाराची संधी मिळणार आहे.

मेळाव्याचे सविस्तर नियोजन:

​१. वर्धा शहर:

  • दिनांक: २७ मार्च
  • स्थळ: पांडुरंग सदाशिव खानखोजे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), वर्धा.

​२. पुलगाव शहर:

  • दिनांक: ३० मार्च
  • स्थळ: हरदयाल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), पुलगाव.

थेट मुलाखती आणि निवड प्रक्रिया:

या मेळाव्यात विविध नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. पात्र उमेदवारांच्या जागेवरच मुलाखती घेऊन निवड प्रक्रिया राबविली जाणार आहे. खासगी क्षेत्रातील रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी हा मेळावा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

महत्वाची सूचना:

इच्छुकांनी आपल्या मूळ शैक्षणिक पात्रतेच्या प्रमाणपत्रांसह (Original Certificates), आधार कार्ड आणि बायोडाटाच्या प्रती घेऊन मेळाव्याच्या ठिकाणी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकाऱ्यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या