सचिन हाडके
मुख्य संपादक (वंचित वार्ता)
हिंगणघाट:भारतीय बौद्ध महासभा (दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया) तालुका व नगर शाखा, हिंगणघाटच्या कार्यकारिणीची निवडणूक येत्या रविवार, दिनांक २९ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही निवडणूक प्रक्रिया मा. राहुलजी गायकवाड जिल्हा अध्यक्ष व मधुकरराव वानखेडे सरचिटणीस वर्धा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.
निवडणुकीचा तपशील:
- स्थळ: मिलिंद नगर बुद्ध विहार, हिंगणघाट.
- वेळ: सकाळी ११:०० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत.
- दिनांक: २९ मार्च २०२६ (रविवार).
या निवडणूक प्रक्रियेमध्ये हिंगणघाट शहरातील विविध वॉर्डातील सदस्य, शाखा प्रतिनिधी आणि ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने करण्यात आले आहे. मातृसंस्थेच्या कार्याला गती देण्यासाठी आणि लोकशाही मार्गाने नवीन कार्यकारिणी निवडण्यासाठी प्रतिष्ठित नागरिकांनी व सभासदांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून सहकार्य करावे, असे पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
या संदर्भातील अधिकृत सूचना तालुका अध्यक्ष परशुराम वाघमारे आणि सरचिटणीस सुनील तेलतुंबडे यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आली आहे. समाजातील सर्व घटकांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या