Type Here to Get Search Results !

Vanchit Varta 24 news

Vanchit Varta 24 news

हिंगणघाट पोलिसांची वेळा शिवारात मोठी कारवाई; गावठी दारूचे रसायन जप्त, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

 



हिंगणघाट (वर्धा): आशिष अंबादे

स्थानिक हिंगणघाट पोलीस स्टेशनच्या पथकाने वेळा शिवारात सुरू असलेल्या अवैध गावठी दारूच्या अड्ड्यावर धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत दारू तयार करण्यासाठी साठवून ठेवलेले रसायन जप्त करण्यात आले असून आरोपीविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, २४ मे २०२६ रोजी हिंगणघाट पोलीस पथकातील कर्मचारी प्रविण बोधाने, स्वप्नील जिवने, सागर सामृतवार आणि प्रमोद डडमल यांना मुखबिराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, मौजा वेळा शिवारातील झाडाझुडपांमध्ये एक इसम अवैध गावठी मोहा दारू काढण्याच्या तयारीत आहे.

दोन प्लास्टिक ड्रमसह मुद्देमाल जप्त

​माहिती मिळताच पोलीस पथकाने दोन पंचांसमक्ष वेळा शिवारात सापळा रचून पाहणी केली. यावेळी आरोपी लीलाधर रामजी बोरकर (रा. मौजा वेळा, ता. हिंगणघाट, जि. वर्धा) हा झाडाझुडपांच्या आडोश्याला दोन प्लास्टिक ड्रममध्ये गावठी मोहा दारू तयार करण्यासाठी लागणारे कच्चे मोहा रसायन (सडवा) तयार करताना रंगेहात मिळून आला. पोलिसांनी जागीच घटनास्थळ पंचनामा करून आरोपीच्या ताब्यातून एकूण १५,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनात धडक कारवाई

सदरची यशस्वी कामगिरी वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. सौरभकुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुशिलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात हिंगणघाटचे पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांच्या निर्देशानुसार पोलीस कर्मचारी प्रविण बोधाने, स्वप्नील जिवने, सागर सामृतवार आणि प्रमोद डडमल यांनी केली आहे.


​या कारवाईमुळे वेळा शिवार व परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून, अवैध धंद्यांविरुद्ध अशीच कडक कारवाई सुरू ठेवण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या