Type Here to Get Search Results !

Vanchit Varta 24 news

Vanchit Varta 24 news

महामाता रमाई आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त कल्याण पूर्वेत भावपूर्ण अभिवादन; शेकडो नागरिकांची उपस्थिती

 



कल्याण (प्रतिनिधी - अमोल जाधव):

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहचारिणी, त्याग आणि संघर्षाची मूर्ती महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या ९१ व्या पुण्यतिथीनिमित्त कल्याण पूर्व येथील रमाई आंबेडकर चौक येथे भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला परिसरातील शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

​प्रतिमेस पुष्पहार व दीपप्रज्वलन करून सुरुवात

​कार्यक्रमाची सुरुवात माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी माता रमाईंना विनम्र अभिवादन करत त्यांच्या त्यागमय जीवनकार्याला मानवंदना दिली. “माता रमाई यांचे त्याग, संघर्ष आणि समर्पण हे समाजासाठी नेहमीच प्रेरणादायी आहे,” अशा भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या.

​नागरिकांसाठी थंडगार ताक वाटप

​सध्या वाढलेल्या कडक उष्णतेच्या पार्श्वभूमीवर, सामाजिक भान राखत परिसरातील नागरिकांसाठी मोफत थंडगार ताकाचे वाटप करण्यात आले. या स्तुत्य उपक्रमाचे उपस्थित नागरिकांनी विशेष कौतुक केले. या उपक्रमामुळे परिसरात सामाजिक सलोखा, एकात्मता आणि बंधुभावाचे वातावरण निर्माण झाले. महिला, पुरुष तसेच तरुण-तरुणी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत कार्यक्रमाला उत्साहपूर्ण स्वरूप प्राप्त करून दिले.

​आयोजक आणि मार्गदर्शक

​हा भव्य उपक्रम 'सारो' (SARO) संस्था, अ‍ॅड. साहिल रोकडे, स्नेहलताई रोकडे तसेच संविधान सैनिक मंचचे अध्यक्ष श्री. राकेश प्रकाश गायकवाड यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. तर कार्यक्रमासाठी आयु. केतनभाऊ रोकडेमाजी नगरसेवक रितेश खराटे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

​मान्यवरांची उपस्थिती

​याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब रोकडे, उद्योगपती हरिभाऊ भालेराव, नगरसेविका डॉ. पूजाताई गायकवाड, प्रियताई जाधव, इंदू खबाळे, रेश्मा शिरकर, पूजा शिंदे, कमल व्यवहारे, अशोक भोसले, सुनील डाळिंबे, अविनाश शिरकर, विशाल म्हस्के आणि प्रशांत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

​कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शुभम चंदन, आशुतोष शेडे, हार्दिक चाबुकस्वार, शमीक खराटे, संकेत कांबळे, गणेश ताटळे, अनिकेत गायकवाड, अनिकेत नितनावरे, पुरुषोत्तम शेलार, यश भालेराव, यश विसावे, अजिंक्य पाबले, अजिंक्य अत्याले, साहिल कलवार, शशांक मगर, अभिषेक अहिरे, अमित गायकवाड आदी कार्यकर्त्यांनी व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांना थंडगार ताक वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

- मुंबई पूर्व ब्यूरो

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या