Type Here to Get Search Results !

Vanchit Varta 24 news

Vanchit Varta 24 news

अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात वर्ध्यात 'धडक मोहीम'; नियमबाह्य वाहनांवर कडक कारवाई!

 



परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आदेश; बसस्थानक परिसरातील २०० मीटर क्षेत्र 'नो पार्किंग झोन'

वर्ध: आशिष अंबादे ( विशेष प्रतिनिधी)

राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) उत्पन्नावर डल्ला मारणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात आता वर्धा विभागाने कंबर कसली आहे. परिवहन मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष माननीय श्री. प्रताप सरनाईक यांच्या आदेशान्वये वर्धा बसस्थानक परिसरात अवैध वाहन धारकांवर तीव्र दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. या विशेष मोहिमेमुळे अवैध वाहतूकदारांचे धाबे दणाणले आहेत.

​अवैध प्रवासी वाहतुकीमुळे एस.टी. महामंडळाच्या महसुलात मोठ्या प्रमाणात घट होत आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रवाशांना पुन्हा एस.टी.कडे वळविणे आणि महामंडळाचे उत्पन्न वाढविणे, या उद्देशाने ५ ते १५ जून या कालावधीत ही विशेष धडक मोहीम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत वर्धा बसस्थानक परिसरापासून २०० मीटर अंतरापर्यंत 'नो पार्किंग झोन' घोषित करण्यात आला असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर थेट कारवाई केली जात आहे.

वरिष्ठांचे थेट मार्गदर्शन व पोलिसांची साथ

मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी तथा पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. प्रियंका नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यात ही मोहीम सुरू आहे. वर्ध्यात जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या आदेशाने वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विलास पाटील व त्यांच्या पथकाने स्थानिक प्रशासनासोबत मिळून ही धडक कारवाई केली.


या अधिकाऱ्यांचा कारवाईत सहभाग

​वर्धा बसस्थानक परिसरात वाहतूक शिस्तबद्ध करण्यासाठी स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने विशेष मोहीम राबविली जात आहे. या कारवाईत:

  • अस्मिता लोणे (सुरक्षा व दक्षता अधिकारी)
  • प्रविण कुचनकर (सुरक्षा निरीक्षक)
  • युधिष्ठिर रामचवरे (आगार व्यवस्थापक, वर्धा) यांच्यासह स्थानिक वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून वाहनांवर दंडात्मक कारवाई केली.

एस.टी. प्रशासनाचे आवाहन

​अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी भविष्यातही अशा प्रकारच्या मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

​"प्रवाशांचा प्रवास सुरक्षित, आरामदायक आणि आनंददायी व्हावा ही महामंडळाची भूमिका आहे. नागरिकांनी खाजगी व अवैध वाहनांचा प्रवास टाळून महामंडळाच्या अधिकृत एस.टी. बसेसचाच वापर करावा आणि बसस्थानक परिसरातील वाहतूक नियमांचे पालन करावे."

युधिष्ठिर रामचवरे, आगार प्रमुख, वर्धा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या