Type Here to Get Search Results !

Vanchit Varta 24 news

Vanchit Varta 24 news

प्रभाग क्र. १२ मध्ये पावसाळी स्वच्छता व नागरी सुविधांची प्रत्यक्ष पाहणी

 



हिंगणघाटच्या नगराध्यक्ष डॉ. नैना तुळसकर यांनी घेतला समस्यांचा आढावा; नागरिकांना स्वच्छतेचे आवाहन

मुख्य संपादक / हिंगणघाट : सचिन हाडके 

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात निर्माण होणाऱ्या समस्या आणि नागरी सुविधांचा आढावा घेण्यासाठी हिंगणघाट नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष डॉ. नैना तुळसकर यांनी प्रभाग क्र. १२ ला भेट दिली. यावेळी त्यांनी परिसरातील स्वच्छता व्यवस्था, पावसाळी पाण्याचा निचरा आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांची प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासनाला आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

​या दौऱ्यादरम्यान स्थानिक नगरसेविका सौ. वंदनाताई शंकरराव मैंद यांनी नगराध्यक्षांना परिसरातील प्रलंबित समस्या, हिंगणघाटकर नागरिकांच्या प्रामुख्याने येणाऱ्या सूचना आणि प्रभागात आवश्यक असलेल्या विविध विकासकामांबाबत सविस्तर माहिती दिली.



‘स्वच्छ परिसर, निरोगी जीवन’ हे ध्येय साकार करूया!

"पावसाळ्यात पाणी साचणे, वाढलेली आर्द्रता आणि अस्वच्छतेमुळे डास, माश्या व संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. हिंगणघाट नगरपरिषद प्रशासन आपल्या स्तरावर सर्व आवश्यक उपाययोजना करत आहे; मात्र शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी जनसहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. प्रत्येक नागरिकाने आपला परिसर स्वच्छ ठेवून प्रशासनाला सहकार्य करावे."

डॉ. नैना तुळसकर (नगराध्यक्ष, हिंगणघाट)


 


​या पाहणी दौऱ्याप्रसंगी महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती सौ. अश्विनीताई चंद्रकांत मानेकर, नगरसेविका सौ. मंगलाताई राजाराम कुमरे यांच्यासह स्थानिक नागरिक आणि नगरपरिषदेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. प्रभागातील नागरिकांच्या समस्यांचे निवारण प्राधान्याने केले जाईल, अशी ग्वाही यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या