आ. समीर कुणावार आणि माजी आमदार सुधाकर कोहळे यांच्या नेतृत्वात हजारो कार्यकर्ते व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
हिंगणघाट (विशेष प्रतिनिधी): सचिन हाडके
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर हिंगणघाट शहरात आज, १४ ऑगस्ट रोजी देशभक्तीचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. आमदार समीर कुणावार यांच्या नेतृत्वात आणि नागपूरचे माजी आमदार सुधाकर कोहळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित भव्य तिरंगा बाईक रॅली अभूतपूर्व उत्साहात आणि यशस्वीपणे पार पडली. हातात राष्ट्रध्वज घेऊन, ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’ च्या निनादाने संपूर्ण हिंगणघाट परिसर देशप्रेमाच्या रंगात न्हाऊन निघाला होता.
नांदगाव चौरस्ता ते 'कृष्णाई निवास' : उत्साही मार्गक्रमण
सकाळी १० वाजता राष्ट्रीय महामार्गावरील नांदगाव चौरस्ता येथून या भव्य बाईक रॅलीचा प्रारंभ झाला. रॅलीच्या अग्रभागी आमदार समीर कुणावार आणि माजी आमदार सुधाकर कोहळे उपस्थित होते. रॅली नांदगाव चौरस्ता, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुतळा, कारंजा चौक, विठोबा चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, नंदोरी चौक आणि उपजिल्हा रुग्णालय चौक मार्गे तहसील कार्यालयावरून पुढे गेली. शहरातील प्रमुख मार्गांवरून भ्रमण करत आमदार समीर कुणावार यांचे निवासस्थान 'कृष्णाई निवास' येथे रॅलीचा दिमाखदार समारोप झाला.
प्रमुख नेत्यांचे मार्गदर्शन
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना आमदार समीर कुणावार आणि माजी आमदार सुधाकर कोहळे यांनी स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व अधोरेखित करत मनामनात राष्ट्रभक्तीची भावना सदैव जागृत ठेवण्याचे आवाहन केले. ‘एक तिरंगा... देश के नाम’ हा संदेश देणाऱ्या या रॅलीला हिंगणघाट मतदारसंघातील युवक, नागरिक आणि भाजप कार्यकर्त्यांनी दिलेला प्रतिसाद अत्यंत प्रेरणादायी असल्याचे नेत्यांनी नमूद केले.
मान्यवरांची मोठी उपस्थिती
या रॅलीत हिंगणघाट नगरपरिषदेच्या अध्यक्षा डॉ. नयना उमेश तुळसकर, भाजप जिल्हा महामंत्री आकाश पोहाणे, विधानसभा प्रमुख संजय डेहणे, समुद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती वामन चंदनखेडे, हिंगणघाट तालुका ग्रामीण अध्यक्ष विनोद विटाळे, समुद्रपूर मंडळ अध्यक्ष हेमंत राऊत, शेषराव तुळणकर, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक भूषण पिसे, माजी नगरसेवक प्रा. डॉ. उमेश तुळसकर, माजी पं.स. उपसभापती योगेश फुसे आणि पालिका उपाध्यक्ष निलेश ठोंबरे सहभागी झाले होते.
तसेच राकेश शर्मा, जिल्हा सचिव सोनू ऊर्फ प्रदीप आर्य, शंकरराव मुंजेवार, शंकरराव आत्राम, नगरसेवक अनिल मावळे, बाजार समिती संचालक प्रफुल्ल बाडे यांच्यासह शहरातील सर्व नगरसेवक-नगरसेविका, ग्रामीण भागातील सरपंच आणि भाजपचे ज्येष्ठ-श्रेष्ठ कार्यकर्ते मोठ्या संख्येने मोटरसायकलसह रॅलीत सामील झाले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजप जिल्हा महामंत्री आकाश पोहाणे यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. संपूर्ण शहरात या यशस्वी रॅलीची आणि देशभक्तीपर वातावरणाची जोरदार चर्चा आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या