Type Here to Get Search Results !

Vanchit Varta 24 news

Vanchit Varta 24 news

भिमनगर प्रभागात ३५ वर्षांनंतर पेटणार प्रकाश! समाजसेवक सुबोध मांडवे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; १५ नवीन विद्युत पोल मंजूर

 



हिंगणघाट / बातमीदार: सचिन हाडके 

प्रभाग क्रमांक १ मधील भिमनगर वार्डातील खारी मैदान परिसर आणि लगतच्या भागात गेल्या ३५ ते ४० वर्षांपासून प्रलंबित असलेला विजेचा प्रश्न अखेर सुटला आहे. स्थानिक समाजसेवक सुबोध मांडवे यांच्या अथक प्रयत्नांना आणि आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या सहकार्याला यश आले असून, शासकीय वर्ष २०२६-२०२७ च्या जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत (DPDC) १५ वाढीव विद्युत पोलसाठी ४,५०,०६१.६९ रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

दीड वर्षाचा सातत्यपूर्ण पाठपुरावा ठरला निर्णायक

भिमनगर वार्डातील खारी मैदान भागात मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती वाढली असली, तरी पोलअभावी नागरिकांना दूरवरून धोकादायक पद्धतीने विजेचे कनेक्शन घ्यावे लागत होते. तसेच पथदिवे नसल्याने नागरिक अंधाराचा सामना करत होते. ही गंभीर समस्या ओळखून समाजसेवक सुबोध मांडवे यांनी गेल्या दीड वर्षापासून आमदार समीरभाऊ कुणावार यांच्याकडे या कामासाठी वारंवार पाठपुरावा सुरू ठेवला होता. नागरिकांच्या मूलभूत हक्कासाठी त्यांनी केलेल्या या प्रयत्नांची दखल घेत आमदारांनी तत्परतेने निधी मंजूर केला.

३५ वर्षांनंतर दुसरा मोठा टप्पा

यापूर्वी १९९१ मध्ये तत्कालीन नगरसेवक मा. रवींद्रजी थुल यांच्या कार्यकाळात या भागात पोल बसवण्यात आले होते. त्यानंतर तब्बल ३५ वर्षांनी समाजसेवक सुबोध मांडवे यांच्या पुढाकाराने पुन्हा एकदा नव्या १५ विद्युत पोलची मंजुरी मिळाली आहे.

​हे काम लवकरच पूर्ण होऊन भिमनगरच्या सेवेत दाखल होणार आहे. सुबोध मांडवे यांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या सहकार्यामुळे प्रभागातील अंधार दूर होणार असल्याने, भिमनगरच्या नागरिकांनी सुबोध मांडवे आणि आमदार समीरभाऊ कुणावार यांचे विशेष आभार मानले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या