Type Here to Get Search Results !

Vanchit Varta 24 news

Vanchit Varta 24 news

हिंगणघाट येथे स्वातंत्र्यदिनी भीषण अपघात; ३ शाळकरी मुलींचा जागीच दुर्दैवी मृत्यू



हिंगणघाट (विशेष प्रतिनिधी):सचिन हाडके 

देशभरात ७९ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतानाच, हिंगणघाट येथे एक अतिशय भीषण आणि काळजाचा ठोका चुकवणारी दुर्दैवी घटना घडली आहे. बिडकर कॉलेजसमोर झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात तीन शाळकरी मुलींचा जागीच मृत्यू झाला असून, या घटनेमुळे संपूर्ण हिंगणघाट शहरावर शोककळा पसरली आहे.

​प्राथमिक माहितीनुसार, १५ ऑगस्टच्या सकाळी आंबेडकर शाळेच्या दिशेने तीन मुली एकाच दुचाकीवर (ट्रिपल सीट) जात होत्या. बिडकर कॉलेजसमोर समोरून जाणाऱ्या 'संगम ट्रॅव्हल्स' या खाजगी बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकी चालवणाऱ्या मुलीचा ताबा सुटला. बॅलन्स बिघडल्याने दुचाकी थेट ट्रॅव्हल्सच्या मागच्या चाकाखाली आली. अपघात एवढा भीषण होता की, तिन्ही मुलींचा जागीच दुर्दैवी अंत झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल

अपघाताची बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. माहिती मिळताच हिंगणघाट पोलीस ठाण्याचे पथक त्वरित घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने तिन्ही मुलींचे मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी (पोस्टमार्टम) शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत.

​आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणात घडलेल्या या घटनेमुळे मृत मुलींच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, शहरात अत्यंत संताप व हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या