Type Here to Get Search Results !

Vanchit Varta 24 news

Vanchit Varta 24 news

नगरसेवक अतुल नंदागवळी यांनी घेतली जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांची भेट; प्रभाग क्र. १७ मधील समस्या सोडवण्याची केली आग्रही मागणी

 



​जिल्हाधिकाऱ्यांकडून तातडीने समस्या निकाली काढण्याचे आश्वासन

​प्रतिनिधी / वृत्तसेवा: सचिन हाडके

हिंगणघाट : ​प्रभाग क्रमांक १७ मधील नागरिकांच्या मूलभूत समस्या त्वरित मार्गी लागाव्यात यासाठी नगरसेवक अतुल भाऊरावजी नंदागवळी हे सातत्याने आक्रमक आणि तत्पर असल्याचे पाहायला मिळत आहे. याच तळमळीतून आज त्यांनी थेट नगरपरिषद येथे पोहोचून माननीय जिल्हाधिकारी मॅडम तसेच माननीय पोलिस अधीक्षक साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि प्रभागातील प्रलंबित समस्यांबाबत निवेदन सुपूर्द केले.

​या प्रत्यक्ष भेटीदरम्यान नगरसेवक अतुल नंदागवळी यांनी प्रभागातील जनतेला भेडसावणाऱ्या विविध अडचणी, रस्ते, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि कायदा-सुव्यवस्थेशी संबंधित प्रश्न अत्यंत सविस्तरपणे प्रशासनासमोर मांडले. नागरिकांना होणारा त्रास लवकरात लवकर दूर व्हावा, यासाठी त्यांनी प्रशासनाकडे तातडीने योग्य ती कार्यवाही करण्याची आग्रही मागणी केली.

​जनतेच्या प्रश्नांप्रती नगरसेवक अतुल भाऊ नंदागवळी यांची असणारी प्रामाणिक तळमळ, आत्मीयता आणि कार्यतत्परता पाहून माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांनी या निवेदनाची गंभीर दखल घेतली. अतुल भाऊंच्या या पाठपुराव्याचे कौतुक करत, प्रभागातील सर्व समस्या प्राधान्याने व तातडीने निकाली काढल्या जातील, असे ठोस आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी नगरसेवक अतुल नंदागवळी यांना दिले.

​आपल्या प्रभागातील प्रत्येक नागरिकाचा प्रश्न हा माझा स्वतःचा प्रश्न आहे, या भावनेतून काम करणारे नगरसेवक अतुल नंदागवळी यांनी "नागरिकांच्या समस्या पूर्णपणे सुटेपर्यंत आमचा हा पाठपुरावा असाच सातत्याने सुरू राहील," असा ठाम विश्वास यावेळी व्यक्त केला. त्यांच्या या धडाडीच्या आणि लोकहितकारी भूमिकेमुळे प्रभाग क्र. १७ मधील नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या